‘सरिताची निषेधाची पद्धत चुकली’
By Admin | Updated: October 6, 2014 03:22 IST2014-10-06T03:22:24+5:302014-10-06T03:22:24+5:30
‘एल. सरितावर झालेल्या अन्यायाचा विरोध तिने पदक नाकारून केला. त्यामागे तिच्या भावना जुळल्या होत्या हे मी समजू शकते;

‘सरिताची निषेधाची पद्धत चुकली’
नवी दिल्ली : ‘एल. सरितावर झालेल्या अन्यायाचा विरोध तिने पदक नाकारून केला. त्यामागे तिच्या भावना जुळल्या होत्या हे मी समजू शकते; पण माझ्याबाबतीत हे घडले असते तर मी वेगळ्या पद्धतीने विरोध दर्शविला असता’, असे मत दिग्गज बॉक्सर एम. सी. मेरीकोम हिने व्यक्त केले.
आशियाडचे सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय बॉक्सर बनलेली मेरीकोम म्हणाली, ‘मी या वादावर भाष्य करू इच्छित नाही; पण माझी मणिपूरची सहकारी सरिताला माझा पाठिंबा आहे. जे घडले ते दु:खद होते. सेमीफायनलमध्ये ती विजेती होती. मला तिच्याबद्दल सहानुभूती आहे; पण मी असते तर वेगळ्या पद्धतीने विरोध दर्शविला असता.’ विरोध कसा केला असता हे मात्र मेरीकोम सांगू शकली नाही. जज आणि रेफ्री निष्पक्ष वागतील अशी अपेक्षा करू या. माझ्या कुठल्याही लढतीदरम्यान पक्षपात होत असल्याचे मला वाटले नाही. सरिताच्या लढतीत ७० टक्के सरिता आणि ३० टक्के पार्क अशी स्थिती होती; पण माझ्या लढतीत शंभर टक्के मीच विजेती होते.’
तीन मुलांची आई असलेली मेरीकोम हिने सांगितले की, मला आशियाडमधील एकाही लढतीत आव्हान मिळाले नाही. सर्व लढती थकवा आणणाऱ्या होत्या; पण सोप्या होत्या. ग्वांगझूच्या तुलनेत वेगळे आव्हान वाटलेच नाही. यात काही बदल झालेला नाही; पण मी मात्र फिट आणि भक्कम झाली आहे. (वृत्तसंस्था)