सानिया एशियाडमध्ये खेळणार

By Admin | Updated: September 13, 2014 00:31 IST2014-09-13T00:31:33+5:302014-09-13T00:31:33+5:30

आशियाई स्पर्धेतून माघार घेणारी भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने आता आपला निर्णय बदलताना दक्षिण कोरियात होणा-या आशियाई स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला

Sania will be playing in Asiad | सानिया एशियाडमध्ये खेळणार

सानिया एशियाडमध्ये खेळणार

बंगलोर : बुधवारी (दि. १०) आशियाई स्पर्धेतून माघार घेणारी भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने आता आपला निर्णय बदलताना दक्षिण कोरियात होणा-या  आशियाई स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे़
यापूर्वी सानियाने अखिल भारतीय टेनिस महासंघाकडे (एआयटीए) आशियाई स्पर्धेत न खेळण्याची परवानगी मागितली होती़ तेव्हा ‘एआयटीए’ने तिला मंजुरी दिली होती़ मात्र, आता सानियाने आपला निर्णय बदलला आहे़ ती आशियाई स्पर्धेत खेळणार आहे़
सानिया टोकियो ओपन टेनिस स्पर्धेतही सहभाग नोंदविणार आहे़ या स्पर्धेत सानियाने गतवेळी विजेतेपद मिळविले होते़ या स्पर्धेतील सानियाच्या गुणांची संख्या आता ९०० वरून ४७५ करण्यात आली आहे़

Web Title: Sania will be playing in Asiad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.