सानियाचा साखरपुडा मोडला अन् शोएबशी कसे झाले लग्न, तुम्हाला माहिती आहे का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 19:09 IST2018-11-15T19:07:20+5:302018-11-15T19:09:56+5:30

सानियाचे लग्न तिचा लहानपणीचा मित्र सोहराबबरोबर ठरले होते.

Sania mirza's engagement was broken and Shoaib malik was married, did you know ... | सानियाचा साखरपुडा मोडला अन् शोएबशी कसे झाले लग्न, तुम्हाला माहिती आहे का...

सानियाचा साखरपुडा मोडला अन् शोएबशी कसे झाले लग्न, तुम्हाला माहिती आहे का...

ठळक मुद्देसानिया आणि शोएब यांचे लग्न जमले कसे, हे तुम्हाला माहिती नसेल...२००९ साली सानिया आणि सोहराब यांचा साखरपूडा झाला होता. पण हा साखरपुडा मोडण्यात आला.सानिया आणि शोएब ऑस्ट्रेलियातील स्पर्धांच्यावेळी एकत्र आले.

नवी दिल्ली : भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाचा आज ३२ वा वाढदिवस. त्यामुळे सानियाबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आज सांगितल्या जात आहेत. पण सानिया आणि शोएब यांचे लग्न जमले कसे, हे तुम्हाला माहिती नसेल...

सानियाचे लग्न तिचा लहानपणीचा मित्र सोहराबबरोबर ठरले होते. २००९ साली सानिया आणि सोहराब यांचा साखरपूडा झाला होता. पण हा साखरपुडा मोडण्यात आला. त्याचवेळी सानियाचे करीअरमध्येही काही चांगले सुरु नव्हते. वाईट फॉर्मातून सानिया जात होती. दुसरीकडे शोएबलाही क्रिकेटमध्ये जास्त धावा करता येत नव्हता. 

सानिया आणि शोएब ऑस्ट्रेलियातील स्पर्धांच्यावेळी एकत्र आले. त्यावेळी दोघांमध्ये संवाद घडला. या संवादाचे पुढे मैत्रीमध्ये आणि त्यानंतर प्रेमात रुपांतर झाले. जेव्हा सानिया आणि शोएब भेटले तेव्हा ते दोघेही समदु:खी होते. पण लग्न केल्यावर मात्र दोघांचे आयुष्य पालटून गेले.

Web Title: Sania mirza's engagement was broken and Shoaib malik was married, did you know ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.