सानिया मिङर उपांत्य फेरीत

By Admin | Updated: September 3, 2014 02:00 IST2014-09-03T02:00:40+5:302014-09-03T02:00:40+5:30

भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिङर हिने मिश्र दुहेरीत ब्राझीलच्या ब्रुनो सोरेससह खेळताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आह़े

Sania Mirza in semifinals | सानिया मिङर उपांत्य फेरीत

सानिया मिङर उपांत्य फेरीत

न्यूयॉर्क : जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिङर हिने मिश्र दुहेरीत ब्राझीलच्या ब्रुनो सोरेससह खेळताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आह़े सानियाने स्पर्धेच्या दुहेरीतही उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळविली आह़े मात्र, लिएंडर पेसला मिश्र दुहेरी आणि दुहेरी लढतीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला़ 
अव्वल मानांकनप्राप्त सानियाने मिश्र दुहेरीत सोरेससह भारताच्या रोहन बोपन्ना आणि स्लोवेनियाच्या कॅटरिना सेब्रोत्निक या जोडीवर 7-5, 2-6, 1क्-5 अशी सरशी साधून थाटात स्पर्धेची सेमीफायनल गाठली़ उपांत्य फेरीच्या लढतीत सानिया आणि सोरेस या जोडीला आता चिनी-तैपेईच्या युंग जॉन चान आणि ब्रिटनच्या रॉस हचिंस यांचा सामना करावा लागणार आह़े
सानियाने महिला दुहेरीच्या तिस:या फेरीत ङिाम्बाब्बेच्या कारा ब्लॅकसह ङोक प्रजासत्ताकाची क्लारा कुकालोव्हा आणि सर्बियाची येलेना यांकोविच या जोडीचे आव्हान 6-3, 6-2 असे मोडून काढून उपांत्यपूर्व फेरी गाठली़ सानिया आणि ब्लॅक यांना पुढच्या फेरीत आता चीनची यि फान शू आणि कझाकिस्तानची 
जरिना दियास या जोडीशी झुंज द्यावी लागेल़ 

 

Web Title: Sania Mirza in semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.