शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

सानिया मिर्झा : निवृत्तीआधी ग्रॅँडस्लॅम जिंकायचे

By admin | Updated: April 18, 2015 01:43 IST

निवृत्तीआधी ग्रँडस्लॅम जिंकायचे

निवृत्तीआधी ग्रँडस्लॅम जिंकायचे
सानिया मिर्झा : कारकिर्दीत दुहेरीत खेळण्याचे व लग्न करण्याचे निर्णय महत्त्वाचे ठरले
हैदराबाद : जागतिक महिला रँकिंगमध्ये नंबर वन बनलेली भारतीय टेनिस तारका सानिया मिर्झा हिने निवृत्तीआधी आणखी एक ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकायची इच्छा असल्याचे सांगितले.
जागतिक क्रमवारीत नुकतीच नंबर वन खेळाडू बनलेल्या सानियाने मिश्र दुहेरीत तीन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.
सानिया म्हणाली, 'मला टेनिस खेळणे आवडते, तसेच सराव व कठोर मेहनतही मला पसंत आहे. मला स्पर्धा आवडते. जोपर्यंत खेळेल तोपर्यंत आपण खेळाचा आनंद घेणार आहोत आणि अधिक कामगिरी उंचावण्याची आपली इच्छा आहे. जर रॉजर फेडरर आजदेखील खेळत असेल तर सर्वांनीदेखील खेळायला हवे. निवृत्तीआधी मला आणखी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकायच्या आहेत.'
फेड कपमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणारी सानिया रविवारी रात्री स्टुअर्टगार्टला रवाना होणार आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात सानियाने मार्टिना हिंगीसच्या साथीने पुढेही खेळणार असल्याचे सांगितले. सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या जोडीने या हंगामात तीन स्पर्धा जिंकल्या आहेत.
सानियाने २0१0 मध्ये लग्न करणे आणि फक्त दुहेरीतच खेळण्याचे घेतलेले दोन निर्णय महत्त्वाचे ठरल्याचे सांगितले. ती म्हणाली, '२0१0 मध्ये कारकीर्द संपुष्टात आल्याचे आपल्याला वाटले. तेव्हा माझ्या मनगटाविषयी समस्या होती. त्या वेळेस टेनिस खेळणे शक्यच नव्हते. त्यामुळे एक निर्णय हा लग्न करण्याचा होता. दुसरा निर्णय मी घेतला तो दुहेरी खेळण्याचा. त्या वेळेस तो कठोर निर्णय होता.' (वृत्तसंस्था)