सानिया-मार्टिना पुन्हा एकत्र
By Admin | Updated: October 27, 2016 04:31 IST2016-10-27T04:31:02+5:302016-10-27T04:31:02+5:30
महिला दुहेरी टेनिसमधील जागतिक क्रमवारीतील नंबर एकची खेळाडू भारताची सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस पुन्हा एकदा मैदानावर एकत्र

सानिया-मार्टिना पुन्हा एकत्र
नवी दिल्ली : महिला दुहेरी टेनिसमधील जागतिक क्रमवारीतील नंबर एकची खेळाडू भारताची सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस पुन्हा एकदा मैदानावर एकत्र खेळताना दिसणार आहेत. या वर्षअखेरीस सिंगापूर येथे होणाऱ्या डब्लूटीए टेनिस स्पर्धेत त्या मैदानावर दिसतील.
सानिया-मार्टिना यांनी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेदरम्यान वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. सानिया-मार्टिना जोडीने अनेक स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. त्यांनी ४१ सामने जिंकत जगातील नंबर १ जोडी बनण्याचा मान मिळविला. २०१५ मध्ये त्यांनी जोडी बनविल्यानंतर तीन ग्रॅँडस्लॅमसह ११ डब्ल्यूटीए जेतेपदे पटकाविली आहेत.
सानिया-मार्टिना डब्ल्यूटीएच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या आहेत. त्यांना या स्पर्धेसाठी दुसरे मानांकन देण्यात आले आहे. फ्रान्सच्या कॅरोलिना गार्सिया व क्रिस्टिना म्लादेनोविच या जोडीला अग्रमानांकन देण्यात आले आहे.
सध्या सानिया झेक गणराज्यच्या बारबोरा स्ट्राइकोव्हा हिच्याबरोबर खेळत आहे, तर हिंगीस अमेरिकेच्या कोको वेंडेंवेगेबरोबर खेळत आहे.