सानिया-कारा उपांत्य फेरीत

By Admin | Updated: September 4, 2014 01:49 IST2014-09-04T01:49:35+5:302014-09-04T01:49:35+5:30

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिङर हिने ङिाम्बाब्वेच्या कारा ब्लॅकसह आपली विजयी घोडदौड कायम राखताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीची सेमीफायनल गाठली़

Sania-Kara in semis | सानिया-कारा उपांत्य फेरीत

सानिया-कारा उपांत्य फेरीत

न्यूयॉर्क : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिङर हिने ङिाम्बाब्वेच्या कारा ब्लॅकसह आपली विजयी घोडदौड कायम राखताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीची सेमीफायनल गाठली़ 
तृतीय मानांकनप्राप्त सानिया आणि कारा या जोडीविरुद्ध कझाकिस्तानची जरीना दियास आणि चीनची यि फान शू यांनी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातून माघार घेतली़ त्यामुळे सानिया आणि कारा यांना उपांत्य फेरीचे तिकीट मिळाल़े आता भारतीय आणि ङिाम्बाब्वेच्या खेळाडूंना उपांत्य फेरीच्या सामन्यात स्वीत्ङरलडची मार्टिना हिंगीस आणि इटलीची फ्लाविया पेनेटा या जोडीचे आव्हान असणार आह़े 
  हिंगीस आणि पेनेटा या पाचवे मानांकनप्राप्त जोडीने महिला 
दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या 
सामन्यात ङोक प्रजासत्ताकची क्वेटा पेश्के आणि स्लोवाकियाची कॅटरिना सेब्रोत्निक या जोडीवर 6-4, 6-3 अशी मात करीत थाटात उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला़ दरम्यान, ज्युनअिर गटात भारताच्या सुमित नागपाल याला कोरियाच्या डकही ली कडून 2-6, 2-6 असा पराभव स्वीकारावा लागला़ त्यामुळे त्याच्यावर स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की ओढवली़ (वृत्तसंस्था)

 

Web Title: Sania-Kara in semis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.