सानिया, कारा सेमीफायनलमध्ये
By Admin | Updated: September 19, 2014 02:12 IST2014-09-19T02:12:46+5:302014-09-19T02:12:46+5:30
गतवेळी अजिंक्यपद मिळविणारी भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिङर हिने कारा ब्लॅकसह डब्ल्यूटीए पॅन पॅसिफिक ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला़

सानिया, कारा सेमीफायनलमध्ये
टोकिओ : गतवेळी अजिंक्यपद मिळविणारी भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिङर हिने कारा ब्लॅकसह डब्ल्यूटीए पॅन पॅसिफिक ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला़
दहा लाख डॉलर बक्षीस रक्कम असलेल्या या स्पर्धेत भारत आणि ङिाम्बाब्वेच्या खेळाडूंनी महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्वीत्ङरलडच्या मार्टिना हिंगिस आणि बेलिडा बेनसिक या जोडीवर सरळ सेटमध्ये 6-4, 6-2 अशा फरकाने विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला़ हा सामना 62 मिनिटांर्पयत चालला़
सानिया आणि कारा यांना आता स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत सर्बियाची येलेना यांकोविच आणि स्पेनची आरांत्जा या जोडीशी झुंज द्यावी लागणार आह़े सानिया मिङर या स्पर्धेनंतर थेट दक्षिण कोरियातील आशियाई स्पर्धेसाठी रवाना होणार आह़े या स्पर्धेस उद्या, शुक्रवारपासून प्रारंभ होणार आह़े (वृत्तसंस्था)