सानिया-हिंगीसचे आठवे जेतेपद
By Admin | Updated: October 11, 2015 04:55 IST2015-10-11T04:55:07+5:302015-10-11T04:55:07+5:30
भारताची सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी आपले विजयी अभियान कायम राखले आहे. डब्ल्यूटीए चायना ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकून सलग

सानिया-हिंगीसचे आठवे जेतेपद
बीजिंग : भारताची सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी आपले विजयी अभियान कायम राखले आहे. डब्ल्यूटीए चायना ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकून सलग आठवा चषक जिंकला.
अग्रमानांकित सानिया-मार्टिना जोडीने सहाव्या मानांकित तैपेईच्या हाओ चिंग चान व युंग जान चान यांना ६-७ (९-११), ६-१ आणि १०-८ असे नमवून विजेतेपदावर आपला हक्क प्रस्थापित केला.
टायब्रेकरमध्ये ७-७ अशी बरोबरी असताना या जोडीने सलग चार गुण मिळविले. सानियाचा २०१५ मधील
हे नवववे तर हिंगीसचे आठवे विजेतेपद आहे. (वृत्तसंस्था)