सानिया-हिंगीसची विजयी घोडदौड सुरू
By Admin | Updated: October 27, 2015 23:45 IST2015-10-27T23:45:42+5:302015-10-27T23:45:42+5:30
सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या जोडीने डब्ल्यूटीए फायनल्स टेनिस टुर्नामेंटमध्ये सुरुवातीच्या सामन्यात सरळ सेटमध्ये विजय मिळविला.

सानिया-हिंगीसची विजयी घोडदौड सुरू
सिंगापूर : सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या जोडीने डब्ल्यूटीए फायनल्स टेनिस टुर्नामेंटमध्ये सुरुवातीच्या सामन्यात सरळ सेटमध्ये विजय मिळविला.
या सत्रात ८ स्पर्धा जिंकणाऱ्या या जोडीने राफेल कोप्स जोन्स आणि अबीबेल स्पियर्स या अमेरिकी जोडीला राऊंड रॉबिन लीगचे रूप असलेल्या मालिकेच्या सुरुवातीच्या सामन्यात ६-४, ६-२ असे पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये सानिया आणि हिंगीस जोडीने एक ब्रेक पॉइंट घेतला, तर दुसऱ्या सेटमध्ये सहा ब्रेक पॉइंट वाचवले. त्यानंतर अमेरिकी जोडीची सर्व्हिस दोन वेळा तोडून मालिका जिंकली.
सानियाने मागच्या वर्षी झिम्बाव्बेच्या कारा ब्लॅकसोबत ही मालिका जिंकली होती. सानिया आणि हिंगीसने दुसऱ्या सामन्यात झेक प्रजासत्ताकाच्या आंद्रिया हलावकोवा आणि लुसी हार्डेका या सातव्या मानांकित जोडीशी लढत होईल. या वर्षात या जोडीने इंडियन वेल्स, मियामी, चार्ल्सटन, विम्ब्लडन, यूएस ओपन, ग्वांग्झू, वुहान आणि चीनमध्ये स्पर्धा जिंकल्या.(वृत्तसंस्था)