सानिया-हिंगीस उपांत्यपूर्व फेरीत

By Admin | Updated: June 24, 2015 23:36 IST2015-06-24T23:36:34+5:302015-06-24T23:36:34+5:30

सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने येथे कॅरोलिना प्लिसकोव्हा आणि मिशेला क्राइजेक या जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव करताना

Sania-Hingis in quarters | सानिया-हिंगीस उपांत्यपूर्व फेरीत

सानिया-हिंगीस उपांत्यपूर्व फेरीत

ईस्टबोर्न : सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने येथे कॅरोलिना प्लिसकोव्हा आणि मिशेला क्राइजेक या जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव करताना एगोन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.
सानिया आणि हिंगीस यांनी झेक प्रजासत्ताक व नेदरलँडच्या बिगरमानांकित जोडीचा ७३,१००० डॉलर बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत ६-०, ६-२ असा पराभव केला. अव्वल मानांकित जोडीने पहिल्या सेटमध्ये दोन ब्रेक पॉईंट वाचविले आणि तीन वेळेस प्रतिस्पर्धी जोडीची सर्व्हिस भेदताना पहिला सेट जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये सानिया
आणि हिंगीस यांनी एकदा त्यांची सर्व्हिस गमावली; परंतु त्यांनी तीन वेळेस प्रतिस्पर्धी जोडीची सर्व्हिस तोडताना फक्त ४५ मिनिटांत विजय मिळविला. उपांत्यपूर्व फेरीत सानिया आणि हिंगीसचा सामना तैपेईच्या हाओ चिंग चान आणि इटलीच्या फ्लाविया पेनेटा या जोडीशी
होईल. (वृत्तसंस्था)

Web Title: Sania-Hingis in quarters