सानिया, काराला अजिंक्यपद

By Admin | Updated: September 21, 2014 01:42 IST2014-09-21T01:42:04+5:302014-09-21T01:42:04+5:30

गतवेळी विजेत्या ठरलेल्या भारताच्या सानिया मिङर हिने ङिाम्बाब्वेच्या कारा ब्लॅकसह डब्ल्यूटीए पॅन पॅसिफिक ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये शानदार विजय मिळवून अजिंक्यपदाचा मान मिळविला़

Sania, Carala championship | सानिया, काराला अजिंक्यपद

सानिया, काराला अजिंक्यपद

टोकिओ : गतवेळी विजेत्या ठरलेल्या भारताच्या सानिया मिङर हिने ङिाम्बाब्वेच्या कारा ब्लॅकसह डब्ल्यूटीए पॅन पॅसिफिक ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये शानदार विजय मिळवून अजिंक्यपदाचा मान मिळविला़ 
महिला  दुहेरीच्या अंतिम सामन्यात सानिया आणि कारा या जोडीने आपला विजयी धडाका कायम राखताना स्पेनच्या गारबाईज मुगुरुजा आणि कार्ला सुआरेज नवारो या जोडीवर सरळ सेटमध्ये 6-2, 7-5 अशा फरकाने मात करीत विजेतेपदावर नाव कोरल़े 
या विजयामुळे सानिया आणि कारा यांनी दहा लाख डॉलर बक्षीस रक्कम असलेल्या या स्पर्धेत आपल्या किताबाचा बचाव केला आह़े भारत आणि ङिाम्बाब्वेच्या खेळाडूंनी केवळ एक तास आणि 15 मिनिटांत स्पॅनिश जोडीचे आव्हान मोडून काढल़े जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सानियाने नुकत्याच झालेल्या यूएस ओपन टेनिस स्पर्धेत ब्राझीलच्या ब्रेना सोरेससह मिश्र दुहेरीचा किताब आपल्या नावे केला होता़ 
दोन प्रतिष्ठित स्पर्धामध्ये विजेतेपद मिळविल्यामुळे आता इंचियोन येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत सानियाच्या कामगिरीवर सर्वाची नजर असणार आह़े कारण या स्पर्धेत भारताचे स्टार खेळाडू लिएंडर पेस, रोहन बोपन्ना आणि सोमदेव देववर्मन सहभाग नोंदविणार नाहीत. या स्पर्धेत सानिया मिश्र दुहेरीत दिविज शरण किंवा साकेत मयनेनीसह खेळणार आह़े (वृत्तसंस्था)

 

Web Title: Sania, Carala championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.