शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

सानिया बनली नंबर वन!

By admin | Updated: April 13, 2015 11:36 IST

भारताची अव्वल टेनिसतारका सानिया मिर्झा रविवारी दुहेरीच्या रँकिंगमधील नंबर वन खेळाडू बनली आहे. अशी किमया साधणारी ती पहिली महिला भारतीय खेळाडू ठरली

चार्ल्सटन : भारताची अव्वल टेनिसतारका सानिया मिर्झा रविवारी दुहेरीच्या रँकिंगमधील नंबर वन खेळाडू बनली आहे. अशी किमया साधणारी ती पहिली महिला भारतीय खेळाडू ठरली. सानिया मिर्झाने आज स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीने येथे डब्लूटीए फॅमिली सर्कल कप स्पर्धा जिंकली.सानियाआधी भारताचा लिएंडर पेस आणि महेश भूपती हेच दुहेरीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचले आहेत. सानिया ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडूदेखील आहे. हिंगीससोबत सानियाचे हे सलग तिसरे विजेतेपद आहे. हे दोन खेळाडू मार्चमध्ये प्रथम एकत्रित खेळले. त्यानंतर या जोडीने आतापर्यंत एकही सामना गमावला नाही. त्यांनी इंडियन वेल्समध्ये पहिली स्पर्धा जिंकली आणि नंतर मियामी येथेही अजिंक्यपद पटकावले. या जोडीने १४ सामन्यांत तीन सेट गमावले आहेत. या हंगामाच्या अखेरीस रेस टू सिंगापूरमध्ये ही जोडी अव्वल बनली. यात दुहेरीच्या अव्वल आठ जोड्या खेळणार आहेत. सानिया आणि हिंगीस जोडीने पहिला सेट अवघ्या २२ मिनिटांत जिंकला. दुसऱ्या सेटमधील पहिल्या गेममध्ये त्यांची सर्व्हिस भेदली गेली; परंतु त्यांनी लगेच मुसंडी मारली. दुसऱ्या सेटच्या पाचव्या गेममध्ये त्यांनी प्रतिस्पर्ध्यांनी मुसंडी मारण्याची संधी गमावली. तथापि, त्यांनी अंतर कमी केले; परंतु सानिया आणि हिंगीस जोडीने १0 व्या गेममध्ये त्यांची सर्व्हिस भेदताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. सानिया आणि हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने सेसी डेल्लाका आणि डारिजा जुराक यांचा एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात ६-0, ६-४ असा पराभव केला. सानियाला या विजयामुळे ४७0 गुण मिळाले. त्यामुळे तिचे एकूण ७,९६५ गुण झाले आहेत. तिने इटलीची सारा इराणी (७,६४0) आणि रॉबर्टा विंची (७,६४0) यांना मागे टाकले. अधिकृत रँकिंग उद्या जाहीर होणार आहे. (वृत्तसंस्था)