सायनाचा मी टेम्पररी कोच -विमलकुमार
By Admin | Updated: September 3, 2014 02:02 IST2014-09-03T02:02:50+5:302014-09-03T02:02:50+5:30
गोपिचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करील असे स्पष्टीकरण माजी बॅडमिंटन स्टार प्रकाश पदुकोन आणि विमल कुमार यांनी खास लोकमतशी बोलताना दिले आहे.

सायनाचा मी टेम्पररी कोच -विमलकुमार
विनय नायडू - मुंबई
भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल ही आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी आमच्याकडे आली असून हे सत्र पुरे होताच ती पुन्हा गोपिचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करील असे स्पष्टीकरण माजी बॅडमिंटन स्टार प्रकाश पदुकोन आणि विमल कुमार यांनी खास लोकमतशी बोलताना दिले आहे. सायनाने गोपीचंद यांना सोडले या वृत्तात तथ्य नसल्याचा खुलासाही त्यांनी केला.
सायना नेहवालने सोमवारी स्पष्ट केले की, मी विमलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार आहे. उबेर कप चषक स्पर्धेदरम्यान त्यांनी दिलेल्या टिप्स मला खूपच उपयोगी पडल्या. आगामी आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी मी बेंगलोरमध्ये आले आहे. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायचे आहे. वल्र्डकप चॅम्पियनशीप स्पर्धेदरम्यान मी गोपीसरांशी बोललो आणि त्यांनी याला होकार दिला.
पण विशेष म्हणजे गोपिचंद यांनी हैदराबाद येथे स्पष्ट केले की, सायना विमलकुमार यांच्याकडे प्रशिक्षण घेणार आहे, हे मला वर्तमान पत्रतूनच कळले. पण त्यापुढे त्यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.
याबाबत निर्माण झालेली संभ्रमावस्था साफ करताना विमल कुमार यांनी खास लोकमतला सांगितले की, ज्या बातम्या
समोर येत आहेत त्या निश्चितच निराशाजनक आहेत. कोपनहेगन येथे वर्ल्ड चॅम्पियनशीपदरम्यान
आम्ही भेटलो. त्यावेळी मी सायना, गोपीचंद आणि राष्ट्रीय निवडकर्ती मधुमिता बिश्त असे चौघे एकत्र बसलो होतो.
यावेळी बेंगलोरमध्ये सराव शिबीर होणार असल्याचे मला त्यावेळी कळले. सायनाने यावेळी आपण अलिकडील काळातील निकालाबाबत निराश असल्याचे सांगितले. यावेळी तिने आपण बेंगलोरमध्ये माङयाकडे प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली.
याला मी होकार दिला. हे लाँगटर्म प्लॅनिंग नाही. तिला केवळ फ्रेश माईंडने सराव करुन पुनरागमन करायचे आहे. प्रकाश पदुकोन हे या सराव शिबीरात तिचे मेंटॉर म्हणून काम पाहणार आहेत, त्यांच्या अकादमीनेही सायना आणि गोपी यांच्यात कोणतीही कटुता नसल्याचे म्हंटले आहे.
सायना पदुकोणकडून प्रशिक्षण घेणार
सायना नेहवाल हिने राष्ट्रीय प्रशिक्षक पी़ गोपीचंद यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असताना माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी सायना दोन आठवडे आमच्या अॅकॅडमीत सराव करणार असल्याचे म्हटले आह़े पदुकोण म्हणाले, ‘‘सायना विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन आठवडे आगामी आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी आमच्या अॅकॅडमीत सराव करणार आह़े दरम्यान, पदुकोण हे सायना नेहवालच्या मार्गदर्शकाची भूमिका निभावणार आहेत़