ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सायनाची बाजी

By Admin | Updated: June 29, 2014 11:40 IST2014-06-29T11:40:03+5:302014-06-29T11:40:03+5:30

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्पेनच्या कॅरोलिना मारियाचा सहज पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले.

Saina wins in Australian Open | ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सायनाची बाजी

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सायनाची बाजी

>ऑनलाइन टीम
सिडनी, दि. २९-  भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्पेनच्या कॅरोलिना मारियाचा सहज पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले. सायनाने मारियाचा २१-१८, २१-११ ने पराभव केला. सायनाचे यंदाच्या मोसमातील हे सलग दुसरे विजेतेपद आहे. 
ओस्ट्रेलियन ओपनमध्ये चीनच्या शिजियान वांगचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारणा-या सायनाने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात सुरुवातीपासून आक्रमक खेळी केली. सायनाने मारिनचा धूव्वा उडवत सिडनीत भारताचा विजयी झेंडा रोवला. या स्पर्धेत विजय मिळवणा-या सायनाला साडे सात लाख डॉलर्स पुरस्कार राशी देण्यात आली. 

Web Title: Saina wins in Australian Open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.