सायनाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण
By Admin | Updated: October 23, 2015 01:39 IST2015-10-23T01:39:01+5:302015-10-23T01:39:01+5:30
जपान ओपन आणि डेन्मार्क ओपनमधून प्रारंभीच आव्हान संपुष्टात आल्याचे नुकसान भारतीय बॅडमिंटन तारका सायना नेहवाल हिला सोसावे लागले. त्यामुळे तिची क्रमवारीत

सायनाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण
नवी दिल्ली : जपान ओपन आणि डेन्मार्क ओपनमधून प्रारंभीच आव्हान संपुष्टात आल्याचे नुकसान भारतीय बॅडमिंटन तारका सायना नेहवाल हिला सोसावे लागले. त्यामुळे तिची क्रमवारीत घसरण होऊन ती दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. आॅल इंग्लंड आणि वर्ल्ड चॅम्पियन स्पेनची कॅरोलिन मारीन ही आता अव्वल स्थानी आली आहे.
जागतिक बॅडमिंटन महासंघाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत सायना दुसऱ्या स्थानी घसरली आहे. तिचे ८१७८२ गुण झाले असून, ती मारिनपेक्षा १६३0 गुणांनी मागे आहे. जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत मारिनकडून पराभूत झाल्यानंतर सायना जपान आणि डेन्मार्क ओपनमध्ये दुसऱ्याच फेरीत पराभूत झाली होती.
त्याचवेळी जागतिक स्पर्धेत दोन वेळेस कास्यपदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू १३ व्या स्थानी कायम आहे. पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणय यांचीदेखील क्रमवारीत घसरण झाली आहे.
श्रीकांत एका स्थानाने घसरून सहाव्या क्रमांकावर आहे,तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन पारुपल्ली कश्यप १0 व्या स्थानापासून आठव्या क्रमांकावर पोहोचला. प्रणयची एका क्रमांकाने घसरण झाली असून, तो १७ व्या क्रमांकावर आहे, तर अजय जयरामन २५ व्या स्थानी पोहोचला आहे.