सायना, सिंधूची विजयी सलामी

By Admin | Updated: August 11, 2016 22:59 IST2016-08-11T22:59:10+5:302016-08-11T22:59:10+5:30

आॅलिम्पिक कांस्य विजेती सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांनी आॅलिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारी विजयी सलामी दिली.

Saina, Sindhu win the Open | सायना, सिंधूची विजयी सलामी

सायना, सिंधूची विजयी सलामी

ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. 11 - आॅलिम्पिक कांस्य विजेती सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांनी आॅलिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारी विजयी सलामी दिली. ज्वाला गुट्टा- अश्विनी पोनप्पा यांना महिला दुहेरीत पहिल्या सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागले. पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि सुमित रेड्डी यांची जोडी देखील पराभूत झाली.
पाचवे रँकिंग लाभलेल्या सायनाने जी गटात ब्राझीलची लोहानी व्हिन्सेंट हिचा २१-१७, २१-१७ ने पराभव केला. सायनाने ही लढत ३९ मिनिटांत जिंकली. आॅलिम्पिकमध्ये पदार्पण करणाऱ्या सिंधूने हंगेरीची सरोसी लॉरा हिच्यावर २७ मिनिटांत २१-८, २१-९ ने विजय साजरा केला.
त्याआधी ज्वाला आणि अश्विनी यांच्या जोडीला जपानची जोडी मिसाकी मत्सुतोमो- अयाका ताहाशी यांच्याकडून सलग गेममध्ये २१-१५, २१-१० ने पराभवाचे तोंड पहावे लागले. मनू- सुतित यांचा इंडोनेशियाची जोडी मोहम्मद एहसान-हेंद्रासेतियावान यांनी ३२ मिनिटांत २१-१८, २१-१३ ने पराभव केला. सायनाने लंडन आॅलिम्पिकचे कांस्य जिंकले होते. सायनाला उपउपांत्यफेरीत धडक देण्यासाठी १४ आॅगस्ट रोजी युक्रेनची मारिया युलितिना हिच्याविरुद्ध लढत द्यावी लागेल.

Web Title: Saina, Sindhu win the Open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.