सायना, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत
By Admin | Updated: June 27, 2014 01:09 IST2014-06-27T01:09:52+5:302014-06-27T01:09:52+5:30
बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, पी़ व्ही. सिंधू यांनी ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन सुपर सिरीजमध्ये आपली विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत आपला प्रवेश निश्चित केला;

सायना, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत
> सिडनी : भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, पी़ व्ही. सिंधू यांनी ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन सुपर सिरीजमध्ये आपली विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत आपला प्रवेश निश्चित केला; मात्र पुरुष गटात भारताचे आव्हान संपुष्टात आले आह़े
महिला एकेरीतील दुस:या फेरीच्या लढतीत जागतिक मानांकनात आठव्या क्रमांकावर असलेल्या सायना नेहवाल हिने आपल्याच देशाच्या पी़ सी़ तुलसी हिच्या विरुद्ध 42 मिनिटे चाललेल्या लढतीत 21-18, 21-15 असा विजय मिळवून स्पर्धेची पुढची फेरी गाठली,तर सिंधूने थायलंडच्या निचाओन जिंदापोन हिचे आव्हान 21-13, 21-7 असे मोडून काढल़े
पुरुष गटातील एकेरीत साई प्रणीतला पराभवाचे तोंड पाहावे लागल़े दुस:या फेरीच्या लढतीत प्रणीतला सहावे मानांकनप्राप्त चीनच्या वांग ङोंगपिंग याच्याकडून 21-15, 8-21, 21-19 अशा गुणफरकाने पराभवाची नामुष्की ओढवली़ पुरुष गटातील दुहेरी सामन्यांत भारताचा अरुण विष्णू आणि एलविन फ्रान्सिस चीन तैपेईचा ली शंग मुआ आणि साई चिया सिन यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)