ऐरिकोला हरवून सायना सेमीत
By Admin | Updated: June 28, 2014 01:11 IST2014-06-28T01:11:53+5:302014-06-28T01:11:53+5:30
सायना नेहवाल हिने ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आपली घोडदौड कायम राखताना थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केला;

ऐरिकोला हरवून सायना सेमीत
>सिडनी : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आपली घोडदौड कायम राखताना थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केला; मात्र पी़व्ही़ सिंधू हिला पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुश्की ओढवली़
सायनाने कामगिरीत सातत्य राखताना जपानच्या ऐरीको हिरोसे हिचा एकतर्फी झालेल्या लढतीत 21-18, 21-18 असा पराभव केला. ही लढत केवळ 47 मिनिटांर्पयत चालली़ आठवे मानांकनप्राप्त पी़व्ही़ सिंधूवर स्पेनच्या कॅरोलिना मारिनकडून 21-17, 21-17 अशा गुणफरकाने पराभवाची नामुश्की ओढवली़ हा सामना 47 मिनिटे चालला़ सिंधूचा मारिनविरुद्धचा हा सलग दुसरा पराभव ठरला़ (वृत्तसंस्था)