शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सायना नेहवाल उपांत्य फेरीत

By admin | Updated: April 29, 2016 19:44 IST

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने महिलांच्या एकेरीत चीनच्या वांग शिझियानचा पराभव करून आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम चारमध्ये प्रवेश केला.

आशियाई बॅडमिंटन : चीनची वांग शिझियानला अवघ्या ५६ मिनिटांत केले पराभूतवुहान (चीन) : भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने महिलांच्या एकेरीत चीनच्या वांग शिझियानचा पराभव करून आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम चारमध्ये प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत आठव्या आणि या स्पर्धेत पाचवे मानांकन असलेल्या सायनाने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून तिसऱ्या मानांकित वांग शिझियानचा ५६ मिनिटांत २१-१६, २१-१९ गुणांनी पराभव करून अवघड अडथळा पार केला. उपांत्य फेरीत सायनाला सहावी मानांकित चीनच्या वांग यिहान आणि दुसरे मानांकन असलेली जपानची नोजोमी ओकुहारा यांच्यातील विजेत्याविरुद्ध लढावे लागणार आहे. दुखापतीतून बरी झाल्यानंतर पुनरागम केलेल्या सायनाने शुक्रवारी झालेल्या लढतीत नेटजवळ प्लेसिंग आणि काही जोरदार स्मॅश मारून वांग शिझियानला निष्प्रभ केले. सायनाच्या आक्रमक खेळापुढे वांगला काहीच करता आले नाही. पहिल्या गेममध्ये सायनाने सुरुवातीला आघाडी घेतली. नंतर वांगने ४-४ अशी बरोबरी साधली. नंतर सायनाने जोरदार खेळाचे प्रदर्शन करून सलग सात गुण संपादन करून १५-१० अशी आघाडी घेत गेमही जिंकली. दुसऱ्या गेममध्ये सुरुवातीला सायनाला पहिल्या गेमसारखा खेळ करता आला नाही. वांगने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सलग ९ गुण मिळवित १५-९ अशी आघाडी घेतली. त्यानंतर सायनाने आक्रमक खेळ करीत ५ गुण संपादन केले आणि १७-१७ अशी बरोबरी साधली. दोन्ही खेळाडूंना एक-एक गुणांसाठी संघर्ष करावा लागला आणि सायनाने २१-१९ अशी बाजी मारली. रियो आॅलिम्पिक कॉलिफिकेशनसाठी या स्पर्धेतील गुणांच्या दृष्टीने खूप महत्व आहे. त्यामुळे लंडन आॅलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकलेल्या सायनाने वांगविरुध्दच्या विजयात कोणतीच कसर सोडली नाही. या विजयाने सायनाने पाचव्या मानांकति यांगविरूध्द विक्रमी ७-७ विजयाची बरोबरी केली. या दोन्ही खेळाडू त्यांच्या कारर्किदीतील ही १४ वी लढत होती. सायनाचा वांगविरूध्द २०१४ दुबई सुपर सिरीजनंतर पहिला विजय आहे. गत वर्षी सायनाला इंडोनेशिया आणि आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये वांगकडून पराभव पत्करावा लागला होता. (वृत्तसंस्था)