सायना नेहवाल, एचएस प्रणॉय यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; १० दिवसांच्या आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला

By स्वदेश घाणेकर | Published: January 12, 2021 10:05 AM2021-01-12T10:05:38+5:302021-01-12T10:15:50+5:30

कोरोना काळात बंद झालेल्या बॅडमिंटन स्पर्धांना आजपासून सुरुवात होत आहे. थायलंड ओपन २०२१ ( YonexThailandOpen2021) स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत.

Saina Nehwal has tested positive for Covid-19 ahead of the Thailand Open 2021 that was to start today | सायना नेहवाल, एचएस प्रणॉय यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; १० दिवसांच्या आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला

सायना नेहवाल, एचएस प्रणॉय यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; १० दिवसांच्या आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला

Next

कोरोना काळात बंद झालेल्या बॅडमिंटन स्पर्धांना आजपासून सुरुवात होत आहे. थायलंड ओपन २०२१ ( YonexThailandOpen2021) स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. पण, स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताला मोठा धक्का बसला. भारताची स्टार खेळाडू सायना नेहवाल हिची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त समोर आले आहे आणि तिला हॉटेलमध्ये क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले आहे. तिच्यासह भारताच्या आणखी काही खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, परंतु त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. तिसऱ्या कोरोना चाचणीत तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला आहे.

एच एस प्रणॉयलाही कोरोना झाल्याचे वृत्तसमोर येत आहे, तर सायनाचा पती पारुपल्ली कश्यप याला वैद्यकिय  देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. 


६ जानेवारीला झालेल्या कोरोना चाचणीत सर्व सहभागी ८२४ खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. ''मायदेश सोडण्यापूर्वी सर्व खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट सादर केला होता आणि बँकॉकमध्ये दाखल झाल्यानंतर पुन्हा चाचणी करण्यात आली,''असे बॅडमिंटन फेडरेशननं सांगितलं. सयना व प्रणॉय यांना दहा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगितले आहे. सायनाचा पती कश्यप यालाही स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. आज कश्यपचा पहिला सामना कॅनडाच्या जेसन अँथनी हो-शू याच्याशी होणार होता. कश्यपला पुन्हा चाचणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. 
 


भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत विजयी सुरूवात केली. सात्विकराज रँकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या जोडीनं पहिल्या सामन्यात इंडोनेशियाच्या हाफिज फैजल व ग्लोरीया विड्जाजा यांच्यावर २१-११, २७-२९, २१-१६ असा विजय मिळवला. 

यावर सायनानं प्रतिक्रिया दिली, काल कोरोना चाचणी झाल्यापासून मला अजूनही रिपोर्ट मिळालेला नाही. आज सामन्यापूर्वी सराव करत असताना मला कोरोना झाल्याचे सांगण्यात आले आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. नियमानुसार पाच तासांपूर्वी रिपोर्ट येणं अपेक्षित असतं.

Read in English

Web Title: Saina Nehwal has tested positive for Covid-19 ahead of the Thailand Open 2021 that was to start today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.