सायना अंतिम फेरीत
By Admin | Updated: June 29, 2014 01:40 IST2014-06-29T01:40:55+5:302014-06-29T01:40:55+5:30
उपांत्य लढतीत कामगिरीत सातत्य राखताना अव्वल मानांकित चीनच्या शिजियान वांगचा 21-19, 16-21, 21-15 ने पराभव केला

सायना अंतिम फेरीत
>सिडनी : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने शनिवारी खेळल्या गेलेल्या उपांत्य लढतीत कामगिरीत सातत्य राखताना अव्वल मानांकित चीनच्या शिजियान वांगचा 21-19, 16-21, 21-15 ने पराभव केला आणि साडेसात लाख डॉलर्स पुरस्कार राशी असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
सायनाने यंदा सय्यद मोदी ग्रांप्रि स्पर्धेत जेतेपद पटकाविले होते. अंतिम फेरीत सायनाला स्पेनच्या कॅरोलिना मारिनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेल्या मारिनने जपानच्या हाशिमोतोचा 21-17, 21-16 ने सहज पराभव केला.
पहिल्या गेममध्ये उभय खेळाडूंदरम्यान चुरस अनुभवायला मिळाली. 4-4 अशी बरोबरी असताना सायनाने सलग तीन गुण वसूल करीत 7-4 अशी आघाडी मिळविली. त्यानंतर वांगने 7-7 अशी बरोबरी साधली. त्यानंतर 1क्-1क् अशी बरोबरी असताना सायनाने सलग चार गुण मिळवीत 14-1क् अशी आघाडी घेतली. पहिल्या गेममध्ये वांगने एकवेळ 17-16 अशी आघाडी मिळविली होती. पण सायनाने त्यानंतर तीन गुण घेत 19-17 अशी आघाडी घेतली व त्यानंतर 21-19 ने पहिला गेम जिंकला. दुस:या गेममध्ये सायनाने सुरुवातीला 12-7 ने आघाडी घेतली होती. वांगने 13-15 स्कोअर असताना सलग सात गुण घेत 2क्-15 अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर 21-16 ने गेममध्ये सरशी साधली. तिस:या व निर्णायक गेममध्ये प्रत्येक गुणासाठी चुरस अनुभवाला मिळाली. (वृत्तसंस्था)
सहाव्या मानांकित सायनाने एक तास 16 मिनिटे रंगलेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत दुस:या स्थानावर असलेल्या वांगची झुंज मोडून काढली. वांगविरुद्ध कारकिर्दीत आठवी लढत खेळताना सायनाने पाचव्यांदा विजयाला गवसणी घातली. सायना यंदाच्या मोसमात दुस:या विजेतेपदापासून केवळ एक विजय दूर आहे.