सायना अजिंक्य
By Admin | Updated: June 30, 2014 02:19 IST2014-06-30T02:19:50+5:302014-06-30T02:19:50+5:30
सायना नेहवालने अंतिम लढतीत स्पेनच्या कॅरोलिना मारिनचा पराभव करीत साडेसात लाख डॉलर्स पुरस्कार राशी असेलल्या ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिज स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविला.

सायना अजिंक्य
>सिडनी : भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने अंतिम लढतीत स्पेनच्या कॅरोलिना मारिनचा पराभव करीत साडेसात लाख डॉलर्स पुरस्कार राशी असेलल्या ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिज स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविला. दोन वर्षाच्या कालावधीतील सायनाचे हे पहिले सुपर सीरिज विजेतेपद आहे. सहाव्या मानांकित सायनाने यंदाच्या मोसमाच्या सुरुवातीला इंडियन ओपन ग्रांप्रि गोल्ड स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविला होता. सायनाने यापूर्वी 2क्12 मध्ये इंडोनेशियन ओपन सुपर सीरिज स्पर्धेत विजेतेपद पटकाविले होते.
सायनाने अंतिम लढतीतसुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. सुरुवातीला सायनाने 5-2 अशी आघाडी मिळविली होती. त्यानंतर मारिनने 6-8 अशी पिछाडी भरून काढली. मारिनने सव्र्हिसमध्ये चूक केल्यामुळे सायनाला एका गुणाचा बोनस मिळाला. सायनाने 17-12 अशी आघाडी मिळविल्यानंतर मारिन दडपणाखाली आली. सायनाने 21-18 ने पहिला गेम जिंकत 1-क् अशी आघाडी मिळविली. दुस:या गेममध्ये मारिनने चमकदार सुरुवात करीत 3-1 अशी आघाडी घेतली, पण सायनाने बेसलाईनवर चांगला खेळ करीत 11-4 अशी भक्कम आघाडी घेतली. (वृत्तसंस्था)
सायनाने 19-9 अशी आघाडी मिळविली असताना ‘लाईन कॉल’ ला आव्हान दिले. हा निर्णय तिच्या विरोधात गेला, पण रिप्लेमध्ये शटल वाईड पडल्याचे दिसत होते. त्यानंतर सायनाने पुन्हा एक चूक केली. फटका मारताना शटल नेटमध्ये गेले. त्यानंतर मारिनने चुकीचा फटका खेळल्यामुळे सायनाचे विजेतेपद निश्चित झाले.
ब्रेकनंतर सायनाने वर्चस्व कायम राखत प्रतिस्पर्धी खेळाडूला चुका करण्यास बाध्य केले. सायनाने त्यानंतर परंपरागत फटके खेळत 21-11 ने गेम जिंकला आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
सायनाने रविवारी 43 मिनिटे रंगलेल्या अंतिम लढतीत लौकिकाला साजेशी कामगिरी करताना वर्चस्व गाजवले. या लढतीत सायनाने मारिनचा 21-18, 21-11 ने सहज पराभव केला.
या विजयामुळे आनंद झाला. माङया मेहनतीचे चीज झाले. माङया प्रशिक्षकांनी दुखापती टाळण्यासाठी कसून परिश्रम घेतले. विजेतेपद पटकाविण्याची यापेक्षा चांगली वेळ नाही. माङयासाठी हे वर्ष महत्त्वाचे आहे. यंदाच्या मोसमात राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेतेपद राखण्याचे आव्हान असून आशियाई स्पर्धेतही सहभागी व्हायचे आहे. या विजेतेपदामुळे या दोन्ही प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये सहभागी होताना आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळेल, असे सायना म्हणाली़