शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

मि.वर्ल्डमध्ये सागर कातुर्डेने जिंकले सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 4:12 PM

महाराष्ट्राच्या रोहित शेट्टी, वीरेश धोत्रेही पदकविजेता

मुंबई : दक्षिण कोरियाचे जेजू आयलंड भारताच्याशरीरसौष्ठवपटूंनी गाजवले. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या आयकर खात्यात असलेल्या सागर कातुर्डेने 75 किलो वजनीगटात सोनेरी यश मिळवित मि.वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्ण जिंकण्याचे आपले स्वप्न साकारले. सागरसह महाराष्ट्राच्या रोहित शेट्टी आणि वीरेश धोत्रे या दोघांनीही रौप्य जिंकून पदकविजेती कामगिरी केली. भारतासाठी संस्मरणीय ठरलेल्या या स्पर्धेत दहापैकी सात गटात सुवर्ण यश संपादल्यामुळे  जन गण मनचे सूर निनादले.

जेजू आयलंडवर झालेली 11 वी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा भारतासाठी आजवरची सर्वाधिक यशस्वी ठरली. त्यातच महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवपटूंनी धम्माल केली. सहावेळा भारत श्री तसेच महाराष्ट्र श्री आणि मुंबई श्रीचा बहुमान मिळविणाऱया सागर कातुर्डेने 75 किलो वजनी गटात कमाल केली. त्याने आपल्याच भारताच्या जयप्रकाश आणि सतीशकुमारवर मात करीत सोनेरी यश मिळविले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिलेच यश होय. 100 किलो वजनीगटात रोहित शेट्टी थोडक्यात अपयशी ठरला. या गटात भारताचाच दयानंद सिंग अव्वल आला तर रोहितला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारतीय शरीरसौष्ठवात गेली दोन दशके दमदार कामगिरी करणाऱ्या वीरेश धोत्रेने मास्टर स्पर्धेत रौप्य पदक जिंकून आपले अनेक वर्षांचे स्वप्न साकार केले.

 

भारतासाठी अभूतपूर्व यश देणारी स्पर्धा ठरलेल्या मि.वर्ल्डमध्ये 55, 60 आणि 65 किलो या तिन्ही वजनीगटात एकही सुवर्ण जिंकता आले नाही. मात्र पुढील सातही गटात भारताच्या शरीरसौष्ठवपटूंनी सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम केला. हा आजवरचा एक विक्रमच आहे. भारताकडून राजकिशोर नायक, सागर कातुर्डे, बॉबी सिंग, मोहन सुब्रमण्यम, चिथरेश नटेशन, दयानंद सिंग आणि अनुज कुमार यांनी गटविजेतेपद पटकावले. भारताच्या यशानिमित्त जागतिक शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी सर्वच खेळाडूंचे कौतुक केले.

वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निकालपुरूष शरीरसौष्ठव 55 किलो : 1. थुय कहान्ह खुओ (व्हिएतनाम), 2. रामामूर्ती मुरूगेसन (भारत), 3. मोहम्मद मुसा (मालदिव), 4. कुंदन गोपे (भारत), 5. लैशराम नेता सिंग (भारत).60 किलो : 1. आन्ह थाँग ( व्हिएतनाम), 2. इतरंगसी जक्कावत (थायलंड), 3. तुन तुन अंग (म्यानमार), 4. गौरव भंडारी ( भारत), 5. अब्दुला मलवर्न ( मलेशिया)65 किलो : 1. तुन मिन (म्यानमार), 2. तियान्ह शुई (चीन), 3. पानरुयांग सुरासक ( थायलंड), 4. ट्रन होआंग (व्हिएतनाम), 5. कोटनंदारामण मनिवेधन (भारत)70 किलो : 1. राजशेखर नायक (भारत), 2.रामकृष्ण थुंडीपरंबिल (भारत), 3. थाई डुआंग लॅम (व्हिएतनाम), 4. हरीबाबू कृष्णमूर्ती ( भारत), 5. आनक बुडा (मलेशिया).75 किलो : 1. सागर कातुर्डे (भारत), 2. जयप्रकाश वेंकटेशन (भारत), 3. सतिशकुमार रामचंद्रन (भारत), 4. आदम झमरूल (मलेशिया), 5. प्राथत देतनारोंग (मलेशिया).80 किलो : 1. ए. बॉबी सिंग (भारत), 2. सर्बो सिंग (भारत), 3. प्रतीप पानुपोंग ( थायलंड), 4. सिफा (व्हिएतनाम), 5. माथवांगसंग सकोर्ण (थायलंड)85 किलो :  1. मोहन सुब्रमण्यम (भारत), 2. कार्थिक इलुमलाई (भारत), 3. देवा सिंग (भारत), 4. निमकुनचॉन सित्तिपाँग (थायलंड), 5. सर्वानन मणी (भारत).90 किलो :  1. चिथरेश नतेशन ( भारत), 2. सेंथिल कुमारन (भारत), 3. राजेंद्रन मणी (भारत), 4. डॅनिल सियेचनिकोव्ह (उझबेकिस्तान), 5. राहुल बिश्त (भारत).100 किलो : 1. दयानंद सिंग (भारत), 2. रोहित शेट्टी (भारत), 3. उमरजकोव्ह पॅवेल (उझबेकिस्तान),4. कुओल लॅम (व्हिएतनाम), 5. इव्हान अफनासयेव्ह (कझाकस्तान).100 किलोवरील : 1. अनुजकुमार तलियन (भारत), 2. वुत्तीकान कित्तीसक (थायलंड), 3. फझल सय्यद (पाकिस्तान), 4. बी. पूर्णचंद्रन (भारत), 5. किरणकुमार संजीवा (भारत).

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवIndiaभारत