सचिन आत्मकथेत उलगडणार ‘मास्टर स्ट्रोक’
By Admin | Updated: September 3, 2014 17:28 IST2014-09-03T02:06:17+5:302014-09-03T17:28:41+5:30
खुद्द सचिनच आपल्या ‘सचिन तेंडुलकर, प्लेइंग इट माय वे’ या आत्मकथेतून मैदानावरील आणि खासगी आयुष्यातील अनेक मास्टर स्ट्रोक उलगडणार आहे.

सचिन आत्मकथेत उलगडणार ‘मास्टर स्ट्रोक’
नवी दिल्ली : क्रिकेटचा बेताज बादशहा सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतील चमत्कारांबद्दल अनेक दिग्गजांनी लिहिले असले, तरी आता खुद्द सचिनच आपल्या ‘सचिन तेंडुलकर, प्लेइंग इट माय वे’ या आत्मकथेतून मैदानावरील आणि खासगी आयुष्यातील अनेक मास्टर स्ट्रोक उलगडणार आहे.
सचिनचे हे आत्मचरित्र या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रकाशित होणार आहे. क्रिकेटच्या इतिहासात कसोटी आणि वन-डेचे सर्वाधिक सामने खेळणा:या सचिनने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती.
‘क्रिकेटचा भगवान’ समजला जाणारा भारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणाला, ‘‘35 वर्षापूर्वी एक शाळकरी मुलगा म्हणून बॅट उचलल्यापासून ते ‘वानखेडे’वर मी माङया आयुष्यातील शेवटचा डाव खेळून परतल्यार्पयतचा प्रवास या आत्मकथेत मी सांगणार आहे. हे काम कठीण असले, तरी मी माङया चाहत्यांपुढे सर्व काही ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.’’
सचिनचे हे आत्मचरित्र हॉडर अँड स्टाटन ही संस्था प्रकाशित करीत आहे. या संस्थेचे संपादक रोडी ब्लूमफिल्ड यांनी सांगितले, की गेल्या 25 वर्षात सचिन आपल्या अद्वितीय फलंदाजीने इतिहासातील महान खेळाडू बनला आहे. त्याचे यश असे आहे, की तो नेहमीच कौतुकास पात्र ठरला आहे. महान खेळाडू असूनही तो खूपच नम्र आहे. अशा खेळाडूचे आत्मचरित्र प्रकाशित करावयास मिळणो हे आमचे भाग्य आहे. येत्या नोव्हेंबरात भारत आणि जगात एकाच वेळी या आत्मचरित्रचे प्रकाशन होणार आहे.