सचिन ‘रन केरळ रन’मध्ये सहभागी होणार
By Admin | Updated: December 2, 2014 23:30 IST2014-12-02T23:30:28+5:302014-12-02T23:30:28+5:30

सचिन ‘रन केरळ रन’मध्ये सहभागी होणार
>तिरुवअनंतपूरम: महान क्रिकेटर आणि 35 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा ब्रँड दूत सचिन तेंडुलकरला पुढील महिन्यात केरळमध्ये होणार्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा एक भाग म्हणून काढण्यात येणार्या सामूहिक दौड ‘रन केरळ रन’ मध्ये सहभागी होण्याची शक्यता आह़े क्रीडा मंत्री तिरुवंचूर राधाकृष्णन यांनी आज ही माहिती दिली़ राज्यातील सात हजार केंद्रांवर आयोजित या दौडच्या तारखेची घोषणा तेंडुलकरच्या सहभागाविषयी खात्री झाल्यानंतर घोषित केली जाणार आह़े आम्ही तेंडुलकरला 20 ते 22 तारीख दिली आह़े याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 जानेवारीला या स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत़