विम्बल्डनने इंस्टाग्राम अकाउंटवरून स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतारातील एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये पुष्पा चित्रपटाच्या शीर्षकाच्या फॉन्टमध्ये नोवाक जोकोविच याचे नाव तेलगुमध्ये लिहिले आहे. या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं, असे कॅप्शन देण्यात आले.
विम्बल्डनने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून जोकोविचचा पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये जोकोविचचे नाव तेलगु भाषेत लिहिण्यात आले. या पोस्टरवर नेटकऱ्यांच्या आगळ्यावेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका व्यक्तीने म्हटले आहे की, "या पोस्टवरून असे दिसून येते की, विम्बल्डनचे भारतावर किती प्रेम आहे." दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, विम्बल्डन भारतात लोकप्रिय करण्यासाठी हा प्लान असू शकतो. तिसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, अल्लू अर्जुनचे भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत.
अल्लू अर्जुनचा पुष्पा: द राईज २०२१ मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग पुष्पा द रूल गेल्या वर्षी म्हणजेच २०१४ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट कन्नड व्यतिरिक्त हिंदीसह इतर भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातील 'पुष्पा, पुष्पा राज...झुकेना नही...' हा डायलॉग भारतासह जगभरात प्रसिद्ध झाला.