आयपीएलच्या विजेतेपदासाठी बुकीजची रॉयल चॅलेंजर्सला पसंती
By Admin | Updated: April 9, 2016 14:37 IST2016-04-09T03:53:59+5:302016-04-09T14:37:23+5:30
इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल-२०१६) हंगामात बुकीजची प्रथम पसंती अंतिम विजेतेपदासाठी बंगळुरुच्या रॉयल चॅलेंजर्सला आहे. मुंबई इंडियन्स उपविजेतेपद पटकावेल

आयपीएलच्या विजेतेपदासाठी बुकीजची रॉयल चॅलेंजर्सला पसंती
डिप्पी वांकाणी, मुंबई
इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल-२०१६) हंगामात बुकीजची प्रथम पसंती अंतिम विजेतेपदासाठी बंगळुरुच्या रॉयल चॅलेंजर्सला आहे. मुंबई इंडियन्स उपविजेतेपद पटकावेल आणि किंग्ज इलेव्हन पंजाब ते स्थान जिंकण्याची खूपच कमी शक्यता आहे, असे भाकित त्यांनी व्यक्त केले आहे.
नऊ एप्रिलपासून आयपीएलला सुरुवात होत आहे. येथे वास्तव्यास असलेल्या बुकीजनी ‘लोकमत’ला सांगितले की या स्पर्धेत होणाऱ्या ५६ सामन्यांतील प्रत्येक सामन्यावर साधारणत: ६०० ते ७०० कोटी रुपयांची उलाढाल होईल. अंतिम विजेता निश्चित होईपर्यंत या संपूर्ण स्पर्धेत ६५ ते ७० हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे.
त्याचप्रमाणे पहिल्या दहा षटकांत किती धावा निघतील, अशा सेशन्स पैजांचीही उलाढाल ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि त्या एका सामन्याच्या अंतिम निकालावर ६०० ते ७०० कोटी रुपयांची उलाढाल होईल, असे त्याने सांगितले. नुकत्याच संपलेल्या टी टष्ट्वेंटी स्पर्धेचे अजिंक्यपद वेस्ट इंडिजने जिंकल्यामुळे पंटरांना फार मोठा फटका बसला होता. हे नुकसान ते आयपीएलच्या स्पर्धेत भरून काढण्याचा प्रयत्न करतील, असे हा बुकी म्हणाला.