शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरुचा गुजरातवर १४४ धावांनी 'रॉयल' विजय

By admin | Updated: May 14, 2016 19:28 IST

प्लेऑफ गटातील आव्हान कायम राखण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने गुजरात लायन्सवर १४४ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

ऑनलाइन लोकमत 

बंगळुरु, दि. १४ - प्लेऑफ गटातील आव्हान कायम राखण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने गुजरात लायन्सवर १४४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. बंगळुरुच्या २४९ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा १०४ धावात खुर्दा उडाला. 
 
एबीडिविलियर्स आणि विराट कोहली बंगळुरुच्या विजयाचे शिल्पकार ठरले. दोघांनी संघाच्या विजयाचा पाया रचला. बंगळुरुच्या गोलंदाजांनीही अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन गुजरातच्या फलंदाजांना जखडून ठेवले. त्यामुळे ठराविक टप्प्याने गुजरातचे फलंदाज बाद होत राहिले. गुजरातकडून एरॉन फिंचने सर्वाधिक ३७ धावा केल्या. अन्य फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले. बंगळुरुकडून जॉर्डनने सर्वाधिक चार, चाहलने तीन आणि सचिन बेबीने दोन गडी बाद केले. 
 
 विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांच्या तडाखेबंद शतकी खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणा-या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने गुजरात लायन्सला विजयासाठी २४९ धावांचे डोंगराऐवढे लक्ष्य दिले होते. विराट कोहलीने ५५ चेंडूत १०९ तर, डिविलियर्सने ५२ चेंडूत नाबाद १२९ धावांची खेळी केली. 
 
गुजरातच्या गोलंदाजांची लय बिघडवत दोघांनी मैदानावर चौकार, षटकारांचा पाऊस पाडला. विराटने शतकी खेळीत पाच चौकार आणि आठ षटकार लगावले. डिविलियर्सने १० चौकार आणि बारा षटकारांनी आपली खेळी सजवली. प्लेऑफमध्ये दाखल होण्यासाठी बंगळुरुला कुठल्याही परिस्थिती आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता.  
 
ख्रिस गेल सहा धावांवर स्वस्तात बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या डिविलियर्सने गुजरातच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. विराट १०९ धावांवर बाद झाला. दोघांनी दुस-या विकेटसाठी २२९ धावांची भागीदारी केली.