रोनाल्डोचा वेगळा सराव
By Admin | Updated: June 6, 2014 01:00 IST2014-06-06T01:00:42+5:302014-06-06T01:00:42+5:30
गुडघे स्नायूदुखीच्या समस्येशी संघर्ष करीत असलेला पोतरुगालचा कर्णधार आणि स्टार स्ट्रायकर ािस्तियानो रोनाल्डो याने पुन्हा संघाला सोडून वेगळा सराव केला.

रोनाल्डोचा वेगळा सराव
>न्यूयॉर्क : गुडघे स्नायूदुखीच्या समस्येशी संघर्ष करीत असलेला पोतरुगालचा कर्णधार आणि स्टार स्ट्रायकर ािस्तियानो रोनाल्डो याने पुन्हा संघाला सोडून वेगळा सराव केला.
याविषयी पोतरुगाल फुटबॉल संघटनेने एक निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले, दुखापतीतून सावरणारा मिडफिल्डर रॉल मीरेलेस आणि डिफेंडर पेपेसाठी विशेष प्रशिक्षण योजना राबवली जात आहे. रोनाल्डो आणि मीरेलेस यांच्या दुखापती पाहता संघाच्या चिकित्सा विभागाने त्यांच्यासाठी आधीच विशेष
प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला
होता. पेपेवरही उपचार सुरू आहेत आणि तो हॉटेलमध्ये विशेष ट्रेनिंग घेत आहे.
फिफाचा वर्ल्ड प्लेअर ऑफ द इअर पुरस्कार मिळविणा:या रोनाल्डोला याआधी सोमवारीदेखील विशेषरीत्या वैयक्तिक प्रशिक्षण देण्यात आले. रोनाल्डोच्या गुडघा आणि पोट:यांनाही दुखापत आहे. मीरेलेसच्या डाव्या पोट:यांना दुखापत आहे, तर पेप उजव्या पायाच्या स्नायुदुखीने त्रस्त आहे. (वृत्तसंस्था)
रोनाल्डोवर काळी जादू
4घाना येथील काळी जादू करणा:या नाना क्वाकू बोन्सॅम याने ािस्तियानो रोनाल्डोला आपण जखमी केल्याचा दावा केला आहे. रोनाल्डोला कोणतेही औषध बरे करणार नसून तो यंदाच्या वल्र्डकपपासून मुकेल असा दावाही त्याने केला. बावा अबुडू हा देखील घानात काळ्या जादूसाठी ओळखला जातो.
4 ‘डेवील ऑफ वेनस्डे’ या नावाने प्रचिलीत असलेल्या नाना याच्या या दाव्याने क्रीडा जगत खळबळले आहे. ग्रुप जीमध्ये घाना आणि पोतरुगाल यांच्यात 26 जूनला लढत होणार आहे.
4बोन्सॅम म्हणाला, देवाने दिलेली एक विशिष्ट प्रकारची पावडरमध्ये
झाडपाला आणि इतर पदार्थ यांचे मिo्रण रोनाल्डोच्या छायाचित्रभोवती ओवाळून त्याला दुखापत केली आहे. हे मी सर्व चार महिन्यांपूर्वी केले
असून त्याचे फळ मला मिळाले.
4ही दुखापत कोणत्याही औषधाने बरी होणारी नाही. त्यांना या दुखापतीचे मूळच सापडणार नाही. आज गुडघा दुखतोय, उद्या इतर अवयव दुखतील.