शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

रोनाल्डोला ‘गोल्डन बुट’

By admin | Updated: November 6, 2014 03:21 IST

युरोपियन स्थानिक लीगमध्ये गत हंगामात सर्वाधिक ३१ गोल करणाऱ्या रिआल माद्रिदच्या क्रिस्टीआनो रोनाल्डोला बुधवारी ‘गोल्डन बुट’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

माद्रिद : युरोपियन स्थानिक लीगमध्ये गत हंगामात सर्वाधिक ३१ गोल करणाऱ्या रिआल माद्रिदच्या क्रिस्टीआनो रोनाल्डोला बुधवारी ‘गोल्डन बुट’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदा हा पुरस्कार रोनाल्डोला लुईस सुआरेज याच्यासोबत वाटून घ्यावा लागला. सुआरेजच्या नावारही ३१ गोलची नोंद आहे. मात्र रोनाल्डोने तिसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार संघसहकाऱ्यांना समर्पित करीत असून आणखी अनेक वर्षे फुटबॉल खेळायचे असल्याचे मत रोनाल्डोने या वेळी व्यक्त केले.बॅलोन डी ओर पुरस्कारावर यापूर्वीच नाव कोरणाऱ्या रोनाल्डाने यंदाच्या सत्रात २२ गोल आणि सात असिस्ट केले आहेत. रोनाल्डोच्या झंझावादामुळेच माद्रिदने ला लीगा स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले, तर चॅम्पियन्स लीगच्या पुढच्या फेरीत प्रवेशही निश्चित केला. या पुरस्कार वितरण सोहळ्यात इतक्या मोठ्या संख्येत मान्यवरांची उपस्थिती असेल असे वाटलेही नव्हते, अशी मिश्कील प्रतिक्रिया रोनाल्डोने दिली. तो म्हणाला, माझ्या संघसहकाऱ्यांचे आभार मानतो. त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य झाले नसते. त्यानंतर माझ्या कुटुंबाचे, चाहत्यांचे आणि क्लबचा ऋणी आहे. मला वैयक्तिक पुरस्कार आवडतात आणि त्यासाठी कसून मेहनत घेतो. माझ्यासाठी हा पहिला गोल्डन बुट पुरस्कार आहे. माद्रिदमधील माझ्या पहिल्या दिवसापासून ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्या सर्वांचा हा पुरस्कार आहे. वचन देतो की माद्रिदसाठी सर्वोत्तम खेळ करण्याचा माझा प्रयत्न असेल. हा पुरस्कार माझ्यासाठी खास आहे आणि हा स्वीकारताना मला खूप आनंद होतोय. (वृत्तसंस्था)