रोनाल्डो करणार पोर्तुगालचे नेतृत्व फिफा विश्वचषक
By Admin | Updated: May 15, 2014 04:17 IST2014-05-15T04:14:29+5:302014-05-15T04:17:26+5:30
संघ घोषित; फ्रान्स संघातून नसरीला वगळले बार्सिलोना : ब्राझीलमध्ये येत्या १२ जूनपासून सुरु होणार्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पोतुर्गालसह इतर देशांचे संघ घोषित झाले आहेत.

रोनाल्डो करणार पोर्तुगालचे नेतृत्व फिफा विश्वचषक
संघ घोषित; फ्रान्स संघातून नसरीला वगळले बार्सिलोना : ब्राझीलमध्ये येत्या १२ जूनपासून सुरु होणार्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पोतुर्गालसह इतर देशांचे संघ घोषित झाले आहेत. पोतुर्गाल संघाचे नेतृत्व जगप्रसिद्ध खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डो याच्याकडे सोपविण्यात आले आहे. दुखापतीतून हा खेळाडू सावरला असून पोतुर्गाल आपल्या मोहिमेस १६ जून रोजी होणार्या जर्मनीविरुद्धच्या सामन्यापासून सुरुवात करेल. मॅन्चेंस्टर सिटीचा मिडफिल्डर २६ वर्षीय सामिर नार्सीला फ्रान्स संघातून वगळण्यात आले. नार्सीने आपल्या फुटबॉल कारर्किदीत उत्कृष्ट खेळाच्यां जोरावर ४१ कॅप्स जिंकल्या आहेत. टेव्हेजे बाहेर; लोवेज, पालासियोला संधी जुवेंट्स क्लबला इटालियन लीगमध्ये विजेतेपद जिंकून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणारा स्ट्राइकर कार्लोस टेव्हेजला मार्गदर्शक अलेजांद्रो साबेलने अर्जेटिना संघात स्थान दिले नाही. त्याच्या ऐवजी इलेकील लावेज आणि रौद्रिरगो पालासियोला ३० सदस्यांच्या संघात स्थान देण्यात आले आहे. ब्राझिल येथे विश्वचषकादरम्यान वापरण्यात येणार्या चेंडूची चाचणी हॅम्बर्ग येथे मंगळवारी जर्मनीविरूद्ध पोलंड यांच्यातील झालेल्या मित्रत्वाच्या सामन्यात घेण्यात आली. (वृत्तसंस्था)