टेनिस कोर्टवर सुरु झाला रोमान्स; KISS करतानाचे फोटो वायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 17:57 IST2019-09-04T17:57:03+5:302019-09-04T17:57:08+5:30

स्वितोलिनाने या रोमान्सबद्दल सांगितले की...

The romance began on the tennis court; Photos from KISS went viral | टेनिस कोर्टवर सुरु झाला रोमान्स; KISS करतानाचे फोटो वायरल

टेनिस कोर्टवर सुरु झाला रोमान्स; KISS करतानाचे फोटो वायरल

मुंबई : यूक्रेनची एलिना स्वितोलिना आणि फ्रान्सचा गेल मोंफिल्स हे टेनिस विश्वातील दोन नावाजलेले खेळाडू. पण टेनिस कोर्टवर त्यांचा खेळ रंगण्यापेक्षा जास्त रंगला तो रोमान्स. या दोघांनी टेनिस कोर्टवरच रोमान्स करत एकमेकांवर चुंबनांचा वर्षाव केला. हे दोघे टेनिस कोर्टवर 'किस' करत असल्याचे फोटो आता चांगलेच वायरल  होऊ लागले आहेत.

Elina Svitolina, Gael Monfils kissing and sharing their love in training session | टेनिस कोर्ट में इन खिलाड़ियों के बीच बढ़ रहा रोमांस, KISS करते तस्वीर वायरल

एलिना आणि गेल यांना या रोमान्सचा फायदा अमेरिकन खुल्या स्पर्धेतही होताना दिसतो आहे. कारण या दोघांची स्पर्धेत विजयी घोडदौड सुरु आहे.

स्वितोलिनाने विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान पटकावले होते. त्याचबरोबर अमेरिकन खुल्या स्पर्धेतही तिने अंतिम चार खेळाडूंमध्ये प्रवेश केला आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी ती पहिलीच युक्रेनची पहिली खेळाडू ठरली आहे. स्वितोलिनाचा मित्र गेलची कामगिरीही चांगलीच होत आहे.

स्वितोलिनाने या रोमान्सबद्दल सांगितले की, " आम्ही दोघे एकमेकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. या स्पर्धेच आमच्या दोघांकडूनही चांगली कामगिरी होत आहे. यापुढेही आमच्याकडून दमदार कामगिरी व्हावी, हीच आमची इच्छा आहे."

Web Title: The romance began on the tennis court; Photos from KISS went viral