रॉबर्ट, आनेल्का, डेल धोकादायक खेळाडू!
By Admin | Updated: October 14, 2014 00:27 IST2014-10-14T00:27:54+5:302014-10-14T00:27:54+5:30
इटलीतील खेळाडू आलेस्सांद्रो डेल पियरो हे इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील सर्वात धोकादायक खेळाडू ठरतील, असे मत फुटबॉलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

रॉबर्ट, आनेल्का, डेल धोकादायक खेळाडू!
पणजी : मुंबई एफसीचा चपळ खेळाडू फ्रान्सचा निकोलस आनेल्का, एफसी गोवाचा रॉबर्ट पिरीस आणि दिल्ली डायनोमोजचा इटलीतील खेळाडू आलेस्सांद्रो डेल पियरो हे इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील सर्वात धोकादायक खेळाडू ठरतील, असे मत फुटबॉलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मुंबई एफसीचा निकोलस आनेल्का हा चपळ खेळाडू असून, गोलरक्षकाला चकवा देण्यात तरबेज आहे. इंग्लिश प्रिमीयर लीग फुटबॉल स्पर्धा गाजविलेला हा खेळाडू सर्व स्तरांवर निष्णात आहे. त्याला मार्क करणोसुद्धा अवघड आहे, असे भारतीय संघाचे साहायक प्रशिक्षक सावियो मेसियास यांनी सांगितले. तर, स्पॉट किकवर गोल नोंदविण्यात डेल पियरो हा माहीर आहे. 1क् क्रमाकांची जर्सी परिधान करून इटली संघाकडून खेळलेला हा आघाडीपटू प्रतिस्पध्र्याच्या मनामध्ये कोणत्याही क्षणी धडकी भरवू शकतो. विरोधी संघाच्या गोल सर्कलमध्ये संघ सहका:याकडून हवेतून मिळालेल्या पासवर त्याच फटक्यावर चेंडूला जाळीची दिशा दाखविण्यात तो पटाईत आहे. त्यामुळे तो प्रतिस्पर्धी संघांसाठी धोकादायक ठरू शकतो, असे मेसियास म्हणाले.
गोवा एफसी संघाचे नेतृत्व करणा:या रॉबर्ट पिरीसने आर्सेनल क्लबकडून जबरदस्त प्रदर्शन केले आहे. जर्सी नंबर 7 चा हा खेळाडू गोल पोस्टचा अँगल हेरून नोंदविण्यात पटाईत आहे. केरळ ब्लास्टर
संघाचा फ्रेडी एल. व फुटबॉल
क्लब पुणो संघाचा डॅविड जेम्स
यांच्या कामगिरीकडेही अनेकांचे
लक्ष्य असेल.
इतर संघांचे मार्की खेळाडू : चेन्नई फुटबॉल क्लबचा माजी ब्राङिालीयन खेळाडू व मँचेस्टर युनायटेडचा प्लेमेकर एलानो, पुणो फुटबॉल क्लब फ्रान्सचा माजी स्ट्रायकर डॅविड टी., केरळ ब्लास्टर्स माजी इंग्लिश खेळाडू फ्रॅडी एल., नॉर्थ ईस्ट संघ स्पेनचा माजी खेळाडू जॉन कापदेविया.