रितु, नवज्योत यांचा रेपेचेज फेरीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 03:38 IST2018-10-24T03:38:47+5:302018-10-24T03:38:51+5:30
बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत रितु फोगाट आणि नवज्योत कौर यांना केवळ एकच लढत जिंकता आली.

रितु, नवज्योत यांचा रेपेचेज फेरीत प्रवेश
बुडापेस्ट : येथे सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत रितु फोगाट आणि नवज्योत कौर यांना केवळ एकच लढत जिंकता आली. मात्र यानंतरही त्यांनी मंगळवारी रेपेचेज फेरीत स्थान मिळवत आपल्या पदकाच्या आशा कायम राखल्या.
रितु कांस्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरली, तर गीता आणि बबीता या आपल्या फोगाट भगिनींच्या कामगिरीची ती बरोबरी करेल. मात्र यासाठी तिला आधी बल्गेरियाच्या सोफिया रिस्तोवा आणि त्यानंतर जपानच्या अयाना गेमपेई यांना पराभूत करावे लागेल. याआधी सलामीला रितुने युक्रेनच्या इलोना प्रोकोपेवनिकचा ५-४ असा पराभव केला. मात्र उपांत्यपूर्व फेरीत तिचा फिनलँडच्या पेत्रा मारितविरुद्ध २-६ असा पराभव झाला. यानंतर पेत्रा अंतिम फेरीत पोहचल्याने रितुला कांस्य पदकासाठी संधी मिळाली.