रिओ ऑलिम्पिक - पहिल्या फेरीतच सानिया- प्रार्थना जोडीचा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2016 07:18 IST2016-08-07T07:11:25+5:302016-08-07T07:18:37+5:30
सानिया मिर्झा -प्रार्थना ठोंबरे जोडीला महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.

रिओ ऑलिम्पिक - पहिल्या फेरीतच सानिया- प्रार्थना जोडीचा पराभव
शिवाजी गोरे
रिओ दी जानेरो, दि. ७ - भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेस, रोहन बोपण्णा पाठोपाठ सानिया मिर्झा -प्रार्थना ठोंबरे जोडीला महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. सानिया-प्रार्थना जोडीला चिनच्या पेन सुई - झेंगे सुई जोडीने ६-७, ७-५, ५-७ असे पराभूत केले.
लिएंडर आणि सानिया दुहेरीतील भारताचे अव्वल टेनिसपटू आहेत. त्यांच्याकडून पदकाची अपेक्षा होती. रिओ ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी टेनिसटपटूंनी भारतीय क्रीडाप्रेमींना निराश केले. पुरुष आणि महिला दुहेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता टेनिसमध्ये फक्त मिश्र दुहेरीतील आव्हान जिवंत आहे.
लिएंडर आणि रोहन बोपण्णा जोडीलाही पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला. पुरूष दुहेरीत मार्सिन मॅटकोवोस्की व लुकास्ड कोबोटने यांनी पेस-बोपण्णाचा ४-६, ६-७(६) असा पराभव केला.