रिओ ऑलिम्पिक : नेदरलँड्सच्या सायकलपटूचा अपघात, पाठीचा कणा फ्रॅक्चर
By Admin | Updated: August 8, 2016 08:29 IST2016-08-08T08:29:03+5:302016-08-08T08:29:03+5:30
रिओ ऑलिम्पिकमध्ये अपघातांची मालिका सुरु असून नेदरलँड्सची सायकलपटू अनेमिक वॅन व्लूटेनचा अपघात झाला आहे

रिओ ऑलिम्पिक : नेदरलँड्सच्या सायकलपटूचा अपघात, पाठीचा कणा फ्रॅक्चर
ऑनलाइन लोकमत -
रिओ दि जानेरो, दि. 8 - रिओ ऑलिम्पिकमध्ये अपघातांची मालिका सुरु असून नेदरलँड्सची सायकलपटू अनेमिक वॅन व्लूटेनचा अपघात झाला आहे. शर्यतीदरम्यान झालेल्या या अपघातात अनेमिकच्या पाठीच्या कण्याला जबरदस्त मार लागला आहे. पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला असून सध्या तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आपण लवकर बरे होऊ असं स्वत: अनेमिकने ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे.
महिलांच्या सायकल शर्यतीदरम्यान अनेमिकचा अपघात झाला. टायर लॉक झाल्याने अनेमिक रस्त्याच्या शेजारी असलेल्या दगडावर आपटली. दगडावर आपटल्याने अनेमिक खूप वेळ बेशुद्ध अवस्थेतच होती. विशेष म्हणजे अनेमिक सुवर्णपदकापासून केवळ 10 किलोमीटर दूर होती. पण दुर्देवाने अपघात झाल्याने तिची संधी हुकली. अनेमिकला सध्या आयसीयूत दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे.
I am now in the hospital with some injuries and fractures, but will be fine. Most of all super disappointed after best race of my career.
— Annemiek van Vleuten (@AvVleuten) August 8, 2016
आपल्या करिअरमधील ही सर्वोत्तम शर्यत असताना आपल्या पदरी निराशा पडल्याचं दुख: अनेमिकने व्यक्त केलं आहे.
My goodness... I hope the Netherlands biker who was leading is okay. Wow. American moves to lead #Rio2016pic.twitter.com/slqHd1DV71
— Wes Holtsclaw (@wesholtsclaw) August 7, 2016