रिओ ऑलिम्पिक - दीपिका कुमारीचे आव्हान संपुष्टात
By Admin | Updated: August 11, 2016 17:53 IST2016-08-11T17:50:07+5:302016-08-11T17:53:47+5:30
रिओ ऑलिम्पिकमध्ये पाचव्या दिवसाची सुरुवातही भारतासाठी निराशाजनक झाली आहे.

रिओ ऑलिम्पिक - दीपिका कुमारीचे आव्हान संपुष्टात
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. ११ - रिओ ऑलिम्पिकमध्ये पाचव्या दिवसाची सुरुवातही भारतासाठी निराशाजनक झाली आहे. भारताची अव्वल महिला तिरंदाज दीपिका कुमारीचे आव्हान उपांत्यपूर्वफेरीत संपुष्टात आले. तान या तिंगने दीपिकावर ६-० असा सहज विजय मिळवला.
महिला तिरंदाजीच्या सांघिक गटात आव्हान संपुष्टात आल्यानंतर पदकासाठी व्यक्तीगत तिरंदाजीवर भिस्त अवलंबून होती. मात्र दीपिकाचा इथेही पराभव झाला. आता बोमब्याला देवीवर सर्व भिस्त आहे.
भारतीय नेमबाज अचूक नेम साधण्यात सातत्याने अपयशी ठरत असताना तिरंदाजीकडून पदकाची अपेक्षा आहे. मात्र इथेही पदरी निराशा येत आहे. अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भरभरुन यश मिळवणारे भारतीय नेमबाज आणि तिरंदाज ऑलिम्पिकच्या मंचावर मात्र अपयशी ठरत आहेत.