रिओ ऑलिम्पिक - पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
By Admin | Updated: August 7, 2016 14:30 IST2016-08-07T14:30:04+5:302016-08-07T14:30:04+5:30
ऑस्ट्रेलियाने दोन सुवर्ण आणि एक कास्य अशी तीन पदके मिळवून पदक तालिकेत पहिले स्थान मिळवले.

रिओ ऑलिम्पिक - पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
ऑनलाइन लोकमत
रिओ दी जानेरो, दि. ७ - रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवले. अमेरिका आणि जापानने सर्वाधिक पाच पदके जिंकली असली तरी, ऑस्ट्रेलियाने दोन सुवर्ण आणि एक कास्य अशी तीन पदके मिळवून पदक तालिकेत पहिले स्थान मिळवले.
ऑस्ट्रेलियाने जलतरणात दोन सुवर्ण आणि तिरंदाजीत एक कास्यपदक मिळवले. त्याखालोखाल हंगेरीने दोन सुवर्णपदके मिळवली. अमेरिकेने जलतरणात तीन आणि तिरंदाजीत एक रौप्यपदक मिळवले. वर्जिनिया थ्राशरने दहा मीटर एअर रायफलमध्ये अमेरिकेसाठी पहिले सुवर्णपदक मिळवले.
दक्षिण कोरियाने तिरंदाजीमध्ये एक सुवर्ण आणि ज्युडोमध्ये एक रौप्य पदक मिळवून चौथे स्थान मिळवले. जापानने जलतरणात एक सुवर्ण वेटलिफ्टिंग, जलतरणात प्रत्येकी एक आणि ज्युडोमध्ये दोन कास्यपदक जिंकून पाचवे स्थान मिळवले.