शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दावेदारी नाकारणे मूर्खपणा : अ‍ॅलोट

By admin | Updated: January 28, 2015 02:14 IST

आॅस्ट्रेलियाच्या सध्याच्या दौ-यात टीम इंडियाची कामगिरी ढेपाळली आहे. पण, तरीही आगामी विश्वचषकात संभाव्य दावेदारांमधून भारताला वगळणे हे मूर्खपणाचे ठरेल

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाच्या सध्याच्या दौ-यात टीम इंडियाची कामगिरी ढेपाळली आहे. पण, तरीही आगामी विश्वचषकात संभाव्य दावेदारांमधून भारताला वगळणे हे मूर्खपणाचे ठरेल, असे मत न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज ज्योफ अ‍ॅलोट याने व्यक्त केले आहे.२३ वर्षांनंतर विश्वचषकाचे आयोजन मायदेशात होत असल्याबद्दल १९९९च्या विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारा संयुक्त गोलंदाज ठरलेला अ‍ॅलोट आनंदी दिसला. तो म्हणाला,‘‘भारताविरुद्धची लढत ‘बिग फाईट’ असते. अलीकडे त्यांची कामगिरी ढेपाळली हे खरे आहे, पण अन्य संघांच्या तुलनेत त्यांच्या जमेची बाजू अशी की, ते आॅस्ट्रेलियात खेळत आहेत. त्यांना संभाव्य दावेदारांमधून वगळणे मूर्खपणाचे ठरेल.’’अनेक माजी खेळाडू आणि क्रिकेट तज्ज्ञांनी संभाव्य दावेदार म्हणून यजमान संघाला झुकते माप दिले. न्यूझीलंडने सहा वेळा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली, पण एकदाही त्यांना प्रतिष्ठेचा चषक जिंकता आला नाही. यावर अ‍ॅलोट म्हणाला, ‘‘यंदा आम्ही विश्वचषक जिंकावा असे मला मनापासून वाटते. व्यवस्थापन आणि खेळाडूंनी वर्षभरात मेहनतही घेतली. उत्तम क्रिकेट खेळणारा न्यूझीलंड हा सध्या एकमेव संघ आहे.’’न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा संचालक असलेला हा ४३ वर्षांचा माजी गोलंदाज पुढे म्हणाला, ‘‘संभाव्य विश्वचषक कडवी झुंज अनुभवणारा असेल. आॅस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका बलाढ्य आहेतच, पण आठ संघ असे आहेत, की ज्यापैकी कुणीही विश्वचषकावर नाव कोरू शकतो.’’ आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांनी १९९२ मध्ये संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषविले. त्यात न्यूझीलंडने १४ तर आॅस्ट्रेलियाने २५ सामने आयोजित केले होते. यंदा आॅस्ट्रेलियात अंतिम सामन्यासह २६ आणि न्यूझीलंडमध्ये २३ सामन्यांचे आयोजन होणार आहे. (वृत्तसंस्था)