क्रिकेटमध्येही ‘रेड कार्ड’ची गरज !
By Admin | Updated: May 8, 2014 14:30 IST2014-05-08T12:49:56+5:302014-05-08T14:30:17+5:30
मिशेल स्टार्क- किरोन पोलार्ड यांच्यातील बाचाबाचीतून काही सकारात्मक बोध घ्यावा लागेल. हा क्रिकेटचा अपमान आहे.

क्रिकेटमध्येही ‘रेड कार्ड’ची गरज !
हर्षा भोगले
आपल्याला आग माहिती आहे पण आग विझविणारे यंत्र नसेल तर मोठा अनर्थ घडू शकतो, मी हे मंगळवारी मुंबईत घडलेल्या प्रसंगाबद्दल बलतो आहे. मिशेल स्टार्क- किरोन पोलार्ड यांच्यातील बाचाबाचीतून काही सकारात्मक बोध घ्यावा लागेल. हा क्रिकेटचा अपमान आहे. क्रिकेट मैदानावर दीर्घकाळापासून होत असलेल्या अशा बाबींकडे प्रशासकांनी पाठ फिरविली आहे. तरीही क्रिकेट हा ‘सभ्य माणसांचा खेळ’ असल्याची बोळवण अनेकांकडून केली जाते. गोलंदाजाने आव्हान द्यावे आणि फलंदाजाने त्याला चोख प्रत्युत्तर द्यावे या बाबींवर आम्ही सारेच प्रेम करतो. गोलंदाजाच्या हातून चेंडू सुटला की फलंदाज त्यावर फटका मारून मोकळा होता. या दरम्यान काही गोष्टींची चर्चा होते. ही चर्चा पुढे गेली की वैयक्तिक आणि अभद्र होऊन बसते. गोलंदाजांना वाटते की केवळ आऊटस्विंग करणे पुरेसे नाही तर सोबतच चेहर्यावर रागदेखील व्यक्त व्हायला हवा. पुरुष हा खेळ यासाठीच खेळतात का? दोन माणसे एखाद्या बारबाहेर आपसांत भांडत असतील तर तेथे असणार्या इतरांनी एकमेकांसोबत भांडावे का? याला फार तर तुम्ही ‘ओव्हर रिअॅक्शन’ म्हणून मोकळे व्हाल. मग मागे सरलेल्या फलंदाजाला गोलंदाजाने चेंडू टाकला म्हणून त्याने बॅट फेकून देणे याला ओव्हर रिअॅक्शन मानायचे? स्टार्क-पोलार्ड तंट्यामुळे मैदानावर देखील रेड कार्ड असायला हवे अशी आता गरज भासू लागली आहे. सामन्याच्या त्या वळणावर मुंबई इंडियन्सला पोलार्डची सेवा मिळाली नसती व रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने स्टार्कला बाहेर पाठवले असते तर तुम्हाला हे चित्र पहायलाच मिळाले नसते. आता युवा क्रिकेटपटूंच्या पिढीबद्दल विचार होणार आहे काय. चहल आणि बुमराह यांच्या वागणुकीबद्दल काय? हे खेळाडू असभ्य व्यवहार देखील क्रिकेटसारखेच जलदपणे आणि शिताफीने आत्मसात करतात. मी एखाद्या चहापानाबद्दल बोलन नाही तर असभ्य व्यवहारांवर बंदी घालण्याविषयी चिंता व्यक्त करीत आहे. द्रविड, सचिन, लारा हे विश्वदर्जाचें आणि वादरहित खेळाडू बनू शकले कारण त्यांनी खेळाचा कधीही अपमान केला नाही. मलिंगा आणि धोनी यांना देखील बॉक्सिंग ग्लोज घालण्याची गरज भासली नाही. अशी प्रकरणे आयपीएलने कठोरपणे घ्यावीत. सोबतच वेळ आली आहे ती रेडकार्डचा अवलंब करण्याची! काही खेळाडूंनी आपल्या दुर्व्यवहारामुळे रेडकार्डसारखी प्रणाली पुढे आणण्यास आमंत्रण दिले. आता तुम्ही यापासून पळ काढू शकत नाही. टीव्हीवर हा प्रकार पाहताना ज्यांना मजा वाटत असेल त्यांनी क्रिकेट पाहणे कृपया बंद करावे. ही काही ‘बिगबॉस ’ सिरीयल नाही. हा महान खेळ आहे. या खेळाचे संरक्षण खेळाडू आणि प्रशासकांना करायचे आहे. आग लागलीच असेल तर आग विझविणारी यंत्रणा देखील दूर ठेवून चालणार नाही. (टीसीएम)