बॉक्सिंगमध्ये पुनरागमन हा पुनर्जन्म : जितेंदर
By Admin | Updated: October 27, 2016 18:24 IST2016-10-27T18:24:50+5:302016-10-27T18:24:50+5:30
बॉक्सिंगमध्ये पुनरागमन करणे कधीही सोपे नसते. पण व्यावसायिक बॉक्सिंगमधील पदार्पण हा स्वत:चा पुनर्जन्म मानतो, असे स्टार बॉक्सर जितेंदरचे मत आहे.

बॉक्सिंगमध्ये पुनरागमन हा पुनर्जन्म : जितेंदर
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ : बॉक्सिंगमध्ये पुनरागमन करणे कधीही सोपे नसते. पण व्यावसायिक बॉक्सिंगमधील पदार्पण हा स्वत:चा पुनर्जन्म मानतो, असे स्टार बॉक्सर जितेंदरचे मत आहे. जितेंदर हा हरियाणा पोलीसमध्ये उपअधीक्षक पदावर
कार्यरत आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २००६ मध्ये कांस्य विजेता असलेल्या जितेंदरने आयओएससोबत गुरुवारी करार केला. ही कंपनी आशिया व्यावसायिक बॉक्सिंग चॅम्पियन विजेंदरची देखील प्रमोटर आहे. भिवानीचा रहिवासी असलेला जितेंदर
म्हणाला, माझ्यासाठी बॉक्सिंग रिंकमधील पुनरागमन पुनर्जन्मासारखेच आहे.
माझे मेंटर अखिलकुमार यांचे प्रयत्न तसेच विजेंदरसिंग याच्या प्रेरणेमुळे हे शक्य होऊ शकले. २८ वर्षांच्या जितेंदरची नियुक्ती सध्या पंचकुला येथे झाली आहे. तो म्हणाला,ह्यपोलीसची नोकरी माझे आवडते क्षेत्र आहे. मधुबनी येथे प्रशिक्षणादरम्यान मी गुन्हेगारी कायद्याचा अभ्यास केला. पण बॉक्सिंगपासून कधीही दूर झालो नाही. बीजिंगपाठोपाठ मी २००९ च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकले. त्यानंतर विश्व बॉक्सिंग सिरिजमध्ये २०११ साली भाग घेतला होता. या स्पर्धेत डोळ्याच्या वरच्या भागाला जखम झाल्याने माघार घ्यावी लागली होती. चुकीच्यावेळी जखम झाल्याने बाहेर पडावे लागले. शिवाय फ्लायवेटमधून बँटमवेटमध्ये यावे लागले. यामुळे मेंटर अखिलकुमारच्याच गटात खेळण्याची वेळ आली होती. २०१० च्या आशियाई स्पर्धेसाठी निवड न झाल्याने बाॉक्सिंगमधून माझा इंटरेस्ट कमी झाला होता. पण हरियाणा पोलीसमध्ये असताना पुन्हा एकदा खेळाकडे वळलो आहे.ह्णं जितेंदर डिसेंबर महिन्यात व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये प्रवेश करणार आहे.