रहाणे संघासाठी कुठलीही भूमिका बजावण्यास सज्ज : धोनी
By Admin | Updated: February 24, 2015 00:12 IST2015-02-24T00:12:05+5:302015-02-24T00:12:05+5:30
मुंबईचा प्रतिभावान फलंदाज अजिंक्य रहाणेने अलीकडच्या कालावधीत कामगिरीमध्ये बरीच सुधारणा केली असून, तो संघासाठी कुठलीही

रहाणे संघासाठी कुठलीही भूमिका बजावण्यास सज्ज : धोनी
पर्थ : मुंबईचा प्रतिभावान फलंदाज अजिंक्य रहाणेने अलीकडच्या कालावधीत कामगिरीमध्ये बरीच सुधारणा केली असून, तो संघासाठी कुठलीही भूमिका बजावण्यास सज्ज असतो, असे मत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत शिखर धवनची शतकी खेळी आणि रहाणेने ६० चेंडूमध्ये केलेली ७९ धावांची खेळी यांना सारखेच महत्त्व आहे.
वेलिंग्टन, लॉर्ड्स आणि मेलबर्नमध्ये कसोटी सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या रहाणेमध्ये प्रतिभा असल्याचे दिसून येते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रहाणे उपयुक्त फलंदाज ठरू शकतो.