रावडी रसेलने खेचून आणला विजय
By Admin | Updated: September 18, 2014 01:26 IST2014-09-18T01:26:22+5:302014-09-18T01:26:22+5:30
कोलकाता नाइट रायडर्सने चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पर्धेत ‘अ’ गटात बुधवारी सलामी लढतीत चेन्नई सुपरकिंग्सचा तीन गडी राखून पराभव केला.

रावडी रसेलने खेचून आणला विजय
हैदराबाद: फिरकी गोलंदाज सुनील नरेन आणि पीयूष चावला यांच्या भेदक मा:यानंतर रेयॉन टेन डोएशे (नाबाद 51 धावा) आणि आंद्रे रसेल (58) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पर्धेत ‘अ’ गटात बुधवारी सलामी लढतीत चेन्नई सुपरकिंग्सचा तीन गडी राखून पराभव केला.
चेन्नईने 4 बाद 157 धावा करीत केकेआरपुढे 158 धावांचे लक्ष्य ठेवले होते. केकेआरने सहा चेंडू आधीच 19 षटकांत 7 बाद 159 धावांच्या मोबदल्यात विजय साकार केला. केकेआरची सुरुवात वाईट झाली. आशिष नेहराच्या भेदक मा:यापुढे केकेआने 21 धावांत चार गडी गमावले. रसेल खेळायला आला तेव्हा संघाच्या पाच बाद 51 धावा होत्या. विंडीजच्या या अष्टपैलू खेळाडूने चार चौकार आणि पाच षटकारांचा पाऊस पाडला. डोएशने 41 चेंडूंवर नाबाद 51 धावांची खेळी करीत सामन्याचे चित्र बदलून टाकले. दोघांनी सहाव्या गडय़ासाठी 8क् धावा कुटल्या. कर्णधार गौतम गंभीर 6, मनीष पांडे शून्य, युसूफ पठाण 1 हे पाठोपाठ बाद झाले. या दरम्यान नेहराची हॅट्ट्रिकची संधी हुकली.
त्याआधी सुनील नरेनच्या फिरकीपुढे चाचपडल्यानंतरही कर्णधार धोनीच्या फटकेबाजीच्या बळावर चेन्नईने 4 गडय़ांच्या मोबदल्यात 157 र्पयत मजल गाठली. धोनीने 2क् चेंडू खेळून तीन चौकार व दोन षटकारांसह नाबाद 35 व ड्वेन ब्राव्होने नाबाद 28 धावा केल्या. या जोडीने पाचव्या गडय़ासाठी नाबाद 71 धावा खेचल्या. सुरेश रैना 28, ब्रेंडन मॅक्युलम 22 आणि ड्वेन स्मिथ 2क् यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. नरेनने चार षटकांत केवळ नऊ धावा देत एक बळी घेतला. धोनी आणि ब्राव्हो यांच्यासारख्या फलंदाजांपुढे नरेनने 16 आणि 18 व्या षटकांत केवळ चारच धावा दिल्या. पीयूष चावलादेखील प्रभावी ठरला. त्याने 26 धावांत दोन तर युसूफ पठाणने एक गडी बाद केला. वेगवान गोलंदाज महागडे ठरले. कमिन्सने 49 आणि उमेश यादव याने 43 धावा मोजल्या. (वृत्तसंस्था)
धावफलक
चेन्नई सुपरकिंग्स : ड्वेन स्मिथ ङो. बिस्ला गो. चावला 2क्, ब्रेंडन मॅक्यूलम पायचित गो. पठाण 22, सुरेश रैना पायचित गो. नरेन 24, फाफ डुप्लेसिस यष्टिचित गो. चावला 14, महेंद्रसिंग धोनी नाबाद 35, ड्वेन ब्राव्हो नाबाद 28, अवांतर : 1क्, एकूण: 2क् षटकांत 4 बाद 157 धावा. गोलंदाजी : कमिन्स 4-क्-49-क्, उमेश यादव 4-क्-43-क्, चावला 4-क्-26-2, नरेन 4-क्-9-1, पठाण 3-क्-16-1, रसेल 1-क्-12-क्.
कोलकाता नाईट रायडर्स: मानवेंद्र बिस्ला ङो. अश्विन गो. नेहरा 2, गौतम गंभीर ङो. ब्राव्हो गो. नेहरा 6, मनीष पांडे ङो. मोहित गो. नेहरा क्क्, युसूफ पठाण ङो. डुप्लासिस गो. मोहित 1, रेयॉन टेन डोएशे नाबाद 51, सूर्यकुमार यादव ङो. अश्विन गो. जडेजा 19, आंद्रे रसेल त्रि. गो. नेहरा 58, पॅट कमिन्स धावबाद 8, पीयूष चावला नाबाद 4. अवांतर:1क्, एकूण: 19 षटकात 7 बाद 159 धावा.
गोलंदाजी: नेहरा 4-क्-21-4, ईश्वर पांडे 4-क्-31-क्, मोहित शर्मा 3-क्-31-1, रवींद्र जडेजा 2-क्-25-1, रवीचंद्रन अश्विन 3-क्-29-क्, ड्वेन ब्राव्हो 3-क्-21-क्.