टीम इंडियाच्या संचालकपदी रवी शास्त्री
By Admin | Updated: August 19, 2014 12:58 IST2014-08-19T12:34:25+5:302014-08-19T12:58:53+5:30
वनडे क्रिकेट टीमच्या संचालकपदी माजी खेळाडू रवी शास्त्री याची नियुक्ती करण्यात आली असून संजय बांगर यांला सहाय्यक प्रशिक्षक नेमण्यात आले आहे.

टीम इंडियाच्या संचालकपदी रवी शास्त्री
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १९ - इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआयने कडक पावले उचलली असून आगामी वनडे सामन्यांसाठी माजी कप्तान रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डंकन फ्लेचर मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहेत.
दरम्यान भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक जो. डेविस आणि क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक ट्रेव्हर पेन्नी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. माजी खेळाडू संजय बांगर व भारत अरूण यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून तर आर. श्रीधर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.