राशिद खानला इगलबर्ग मास्टर्सचे किताब
By Admin | Updated: October 4, 2014 22:54 IST2014-10-04T22:54:59+5:302014-10-04T22:54:59+5:30

राशिद खानला इगलबर्ग मास्टर्सचे किताब
>बंगळुरु : दिल्लीच्या राशिद खानने पीजीटीआय इगलबर्ग मास्टर्सचे किताब जिंकल़े खानचे हे सहावे व्यावसायिक किताब आह़े इगल्टन गोल्फ रिसॉर्टमध्ये खानने टूर्नामेंटच्या शेवटच्या दिवशी तीन अंडर 69 चे कार्ड खेळून या किताबाचा मानकरी ठरला़ खानने चार राऊंडमध्ये एकूण 269 चे स्कोअर केल़े सी़ मुनियप्पा रनरअप होता तर नरेंद्र गुप्ता त्याच्यापेक्षा एका स्ट्रोकने पिछाडीवर राहताना तिसरे स्थान पटकावल़े 40 लाख बक्षिसांच्या या स्पर्धेतील विजयासह खान एस़ चिकारंगप्पाला मागे टाकताना पीजीटीआय रोलॅक्स रॅकिंगमध्ये अव्वलस्थानी पोहोचला़ चिकारंगप्पा या स्पर्धेत सातव्या स्थानावर राहिला़