संयुक्त सचिवावर बलात्काराचा आरोप

By Admin | Updated: February 13, 2017 00:01 IST2017-02-13T00:01:35+5:302017-02-13T00:01:35+5:30

भारतीय तायक्वांदो महासंघाचे (टीएफआय) संयुक्त सचिव संजय शर्मा यास खेळाडूंवर कथित बलात्कार केल्याच्या आरोपामुळे अटक

Rape charges against the joint secretariat | संयुक्त सचिवावर बलात्काराचा आरोप

संयुक्त सचिवावर बलात्काराचा आरोप

धनबाद : भारतीय तायक्वांदो महासंघाचे (टीएफआय) संयुक्त सचिव संजय शर्मा यास खेळाडूंवर कथित बलात्कार केल्याच्या आरोपामुळे अटक करण्यात आली.
एका तायक्वांदोपटूने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर शर्माला बोकोरो येथील पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी अटक केली.
शर्मा हा झारखंड राज्य तायक्वांदो संघटनेचा सचिवदेखील आहे. त्याचा मोठा भाऊ प्रभात शर्मा हादेखील टीएफआयचा राष्ट्रीय महासचिव आहे. लैंगिक छळापासून मुलांचे संरक्षण (पोस्को) या अधिनियमांतर्गत शर्मा यास अटक करून तुरुंगात टाकण्यात आल्याचे पोलीस अधिकारी मिश्रा यांनी सांगितले. पीडितग्रस्त खेळाडू बोकारो जिल्ह्याच्या बर्मो येथे राहणारी आहे. तिने ८ फेब्रुवारी रोजी प्राथमिक तक्रार दाखल केली हाती. संजय २00८ पासून लैंगिक छळ करीत असल्याचा आरोप तिने केला.

Web Title: Rape charges against the joint secretariat