रणजी ‘किंग्ज’ला धक्का

By Admin | Updated: December 11, 2014 01:24 IST2014-12-11T01:24:54+5:302014-12-11T01:24:54+5:30

जम्मू-काश्मीर संघाने तब्बल चाळीस वेळा रणजी ट्रॉफीचे अजिंक्यपद आपल्या नावे करणा:या मुंबईला त्यांच्याच मैदानावर धूळ चारून नवा इतिहास रचला.

Ranji 'Kings' push | रणजी ‘किंग्ज’ला धक्का

रणजी ‘किंग्ज’ला धक्का

जम्मू-काश्मीर विजयी : मुंबईवर पराभवाची नामुष्की
मुंबई : जम्मू-काश्मीर संघाने तब्बल चाळीस वेळा रणजी ट्रॉफीचे अजिंक्यपद आपल्या नावे करणा:या मुंबईला त्यांच्याच मैदानावर धूळ चारून नवा इतिहास रचला. गेल्या मोसमातील अपयशी कामगिरी विसरून यंदा नव्या जोमाने मुंबई कामगिरी करेल, अशी आशा होती. मात्र, पहिल्याच सामन्यातील या पराभवामुळे एकेकाळी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दबदबा राखणा:या बलाढय़ मुंबई संघाची सध्या कुणीही यावं टपली मारून जावं, अशी अवस्था झाली आहे.  
मुंबईने विजयासाठी दिलेले 237 धावांचे आव्हान जम्मू-काश्मीरने शुभम खजुरियाच्या (78) शानदार अर्धशतकी खेळीने 6 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. सामन्याच्या चौथ्या दिवशी 1 बाद 58 या धावसंख्येवरून सुरुवात करताना अभिषेक नायरने बंदीप सिंगला बाद करत जम्मू-काश्मीरला धक्का दिला. यानंतर इयान देव सिंगने (3क्) खजुरिआसोबत 52 धावांची भागीदारी करीत संघाचा डाव 
सावरला.  
यानंतर कर्णधार रसूलने मुंबईकरांच्या हातून सामना जवळजवळ काढून टाकला. रसूलने (32) निर्णायक खेळी करताना खजुरिआसोबत 53 धावांची भागीदारी केली.  संघाच्या 171 धावा झालेल्या असताना मुंबईकरांनी जम्मू-काश्मीरवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. इक्बाल अब्दुल्लाने खजुरिआला, तर दाभोळकरने रसूलचा त्रिफळा उखाडताना जम्मू-काश्मीरची 5 बाद 171 अशी अवस्था केली. या वेळी मुंबई बाजी पलटवणार, असे दिसत होते. मात्र, हरदीप सिंग (नाबाद 41) आणि वासिम रझा (16) यांनी 44 धावांची भागीदारी करीत मुंबईकरांचा पराभव जवळ आणला. 215 धावांवर रझा धावबाद झाल्यानंतर आलेल्या ओबैद हरुन (9) याने अखेर्पयत खेळपट्टीवर टिकून राहत हरदीपला चांगली साथ दिली आणि जम्मू-काश्मीरच्या सनसनाटी विजयावर शिक्कामोर्तब केले. (क्रीडा प्रतिनिधी)
 
कामगिरीत सुधारणा करावी लागणार
हा निराशाजनक पराभव आहे. यंदाच्या मोसमाची विजयी सुरुवात करण्याचा आमचा प्रयत्न होता. आता लवकरात लवकर आम्ही हा पराभव विसरून पुढच्या सामन्यावर लक्ष केंद्रित करीत आहोत. हा मोसमातील पहिलाच सामना होता आणि आता कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे. या सामन्यात गोलंदाजांची कामगिरी समाधानकारक झाली असली तरी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर आम्हाला विशेष मेहनत घ्यावी लागेल. पहिल्या डावातील गोलंदाजी आणि दुस:या डावातील सूर्यकुमारचे शतक हे मुंबईसाठी सकारात्मक घडले. जम्मू-काश्मीरने सर्वच बाबतींत चांगला खेळ केला असून, त्यांना विजयाच्या शुभेच्छा आहेत.- प्रवीण आमरे, मुंबई प्रशिक्षक
 
सचिनचे शाब्दिक ‘स्ट्रोक्स’ : जम्मू-काश्मीरविरुद्ध झालेल्या पराभवानंतर ड्रेसिंगरूममध्ये मुंबईच्या खेळाडूंना प्रशिक्षक आमरे यांचे शाब्दिक फटकारे मिळत असतानाच या वेळी दस्तुरखुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेदेखील अचानक एन्ट्री मारल्याने मुंबई संघातील खेळाडूंवर वेगळेच दडपण आले. याबाबत आमरे यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘सचिन तेंडुलकर सर्वासाठी रोल मॉडेल आहे. त्याचा अनुभव सर्वानाचा मोलाचा आहे. आजच्या पराभवामुळे त्याला बोलावण्यात आले नव्हते, तर युवा खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी सचिनने यावे, अशी माझी इच्छा होती.
 
मुंबई : पहिला डाव- सर्व बाद 236 धावा; जम्मू-काश्मीर : पहिला डाव - सर्वबाद 254 धावा. मुंबई: दुसरा डाव - सर्व बाद 253 धावा. जम्मू-काश्मीर : दुसरा डाव - आदिल रेशी ङो. तरे गो. ठाकूर 12, खजुरिआ ङो व गो. अब्दुल्ला 78, बंदीप सिंग ङो. वाघेला गो. नायर 12, सिंग ङो. शेख गो. दाभोळकर 3क्, रसूल त्रि. गो. दाभोळकर 32, हरदीप नाबाद 41, राझा धावबाद (ठाकूर) 16, हरुन नाबाद 9. अवांतर 7; एकूण 69.2 षटकांत 6 बाद 237 धावा. गोलंदाजी : कुलकर्णी 17-2-63-क्; ठाकूर 16.2-2-48-1; नायर 9-2-32-1; अब्दुल्ला 1क्-2-24-1; दाभोळकर 16-2-66-2; यादव 1-क्-3-क्.

 

Web Title: Ranji 'Kings' push

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.