रणजी : मुंबईच्या तिस-या दिवसअखेर ६ बाद २७७ धावा

By Admin | Updated: February 27, 2015 19:42 IST2015-02-27T19:42:02+5:302015-02-27T19:42:02+5:30

रणजीमध्ये मुंबई संघाने तिस-या दिवस अखेर ६ गडी गमावत २७७ धावा केल्या आहेत. मुंबईला विजयासाठी आणखी १६८ धावांची आवश्यकता आहे.

Ranji: 277 runs in 6 overs at the end of the third day of Mumbai | रणजी : मुंबईच्या तिस-या दिवसअखेर ६ बाद २७७ धावा

रणजी : मुंबईच्या तिस-या दिवसअखेर ६ बाद २७७ धावा

ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. २७ - येथे सुरु असलेल्या रणजीमध्ये मुंबई संघाने तिस-या दिवस अखेर ६ गडी गमावत २७७ धावा केल्या आहेत. मुंबईला विजयासाठी आणखी १६८ धावांची आवश्यकता आहे. तर गत चॅम्पियन राहिलेल्या कर्नाटक संघाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईचे अवघे चार गडी बाद करावे लागणार आहेत. तिसरा दिवसाचा खेळ संपला त्यावेळी मुंबईचे सिध्देश्‍ा लाड ४१ धावांवर तर अभिषेक नायर २ धावांवर नाबाद खेळत आहेत. कर्नाटकचा कर्णधार आर विनयकुमार आणि अभिमन्यू मिथून या दोघांनी मुंबईच्या फलंदाजांना धावांपासून रोखण्यात यश मिळविले. यासाठी जलदगती गोलंदाज अरविंद श्रीनाथ आणि फिरकीपटू श्रेयस गोपाल यांनी मदत केली. मुंबईकडून कर्णधार आदित्य तारेने सर्वाधिक ९८ धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने ५० धावांचे योगदान दिले. अखिल हर्वाडकरने ३१ धावा केल्या. कर्नाटकच्या मिथूनने २७ षटकात ४९ धावा देत सर्वाधिक ३ बळी टिपले. तर विनय, गोपाल व श्रीनाथ यांना प्रत्येकी १-१ गडी बाद करण्यात यश मिळाले.

Web Title: Ranji: 277 runs in 6 overs at the end of the third day of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.