भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी महाराष्ट्राचे रणबीरसिंग राहल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 17:04 IST2019-11-02T17:03:43+5:302019-11-02T17:04:52+5:30
२२ नोव्हेंबरपासून ही स्पर्धा चिनी तैपेई येथे होणार आहे.

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी महाराष्ट्राचे रणबीरसिंग राहल
अमरावती : शहर पोलीस दलात कार्यरत रणबीरसिंग राहल यांची १५ वर्षांखालील मुलांच्या गटातील आशियाई कुस्ती स्पर्धेकरिता जाणाऱ्या भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. २२ नोव्हेंबरपासून ही स्पर्धा चिनी तैपेई येथे होणार आहे.
राहल निवडीबद्दल शहर पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, शशिकांत सातव यांनी स्वागत केले. आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच असलेले रणबीरसिंग राहल यांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरणसिंह, सहसचिव विनोद तोमर, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, कुस्ती प्रमुख संजय तिरथकर, सहायक क्रीडा अधिकारी बाजीराव कलांत्रे यांना यशाचे श्रेय दिले आहे.